शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत मुलीच्या माजी प्रियकराने केली भारतीय वंशाच्या दाम्पत्याची हत्या

By admin | Updated: May 7, 2017 11:13 IST

अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या आयटी तंत्रज्ञाची आणि त्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. 7 - अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या आयटी तंत्रज्ञाची आणि त्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. नरेन प्रभू असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांची आणि त्यांच्या पत्नीची राहत्या घरातच हत्या करण्यात आली. दाम्पत्याच्या मुलीच्या माजी प्रियकरानेच त्यांची हत्या केल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे,  या दोघांच्या मृतदेहांसह हल्लेखोर आरोपीचाही मृतदेह घटनास्थळी आढळला. मिर्झा टॅटलिक असं 24 वर्षीय हल्लेखोराचं नाव आहे.
 
 हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी नरेन यांच्या मुलीचे आणि हल्लेखोर आरोपीचे प्रेम प्रकरण होते. मात्र, त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. त्यातून हे हत्याकांड घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. प्रभू यांची कन्या अमेरिकेतील दुसऱ्या भागात राहते. संशयित हल्लेखोराचे तिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र वर्षभरापूर्वी ते वेगळे झाले होते. नरेन यांच्या 20 वर्षीय मुलाने कॅलिफोर्नियातील सॅन होजे  पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. 
 
आणखी एका घटनेत अमेरिकेच्या मोडेस्टो शहरात एका 32 वर्षीय भारतीय नागरिकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे .  जगजीत सिंग यांची हत्या सिगारेटवरून झालेल्या वादातून झाल्याचं समोर येत आहे. पंजाबच्या कपूरथला येथील रहिवासी जगजीत गुरुवारी रात्री  आपले दुकान बंद करत असताना त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला.  जवळपास वर्षभरापूर्वी जगजीत अमेरिकेला गेले होते. जगजीत हे जवळपास 9 तास मृत्युशी झुंज देत होते पण उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला.सिंग यांचे मेव्हणे के. एस. चीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुरुवारी रात्री सिंग यांच्या दुकानात एक ग्राहक सिगारेट घेण्यासाठी आला.  सिंग यांनी नियमानुसार  त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली, पण त्याने दाखवलेले ओळखपत्र अयोग्य असल्याने दोघांमध्ये वादावादी झाली आणि तो ग्राहक निघून गेला. त्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास जगजीत सिंग दुकान बंद करत असताना एका अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने वार केले. 9 तास मृत्युशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला.