शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री मतंग सिंग यांना अटक

By admin | Updated: January 31, 2015 23:36 IST

कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने शनिवारी माजी केंद्रीय मंत्री मतंग सिंग यांना कोलकाता येथे अटक केली.

शारदा चिटफंड घोटाळा : सीबीआयकडून सात तास कसून चौकशीकोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने शनिवारी माजी केंद्रीय मंत्री मतंग सिंग यांना कोलकाता येथे अटक केली. मतंग सिंग यांना सीबीआय कार्यालयात बोलावून त्यांची सात तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक झाली.मतंग सिंग यांना शारदा रियल्टी प्रकरणी गुन्हेगारी कट आणि फसवणुकीच्या आरोपात अटक करण्यात असल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. मतंग सिंग यांची याआधी शारदाप्रकरणी दिल्लीत सक्तवसुली संचालनालयाकडूनही चौकशी करण्यात आली होती. शनिवारी अटक करण्याआधी सीबीआयने त्यांची सात तास चौकशी केली, असे हा प्रवक्ता म्हणाला. मतंग सिंग हे सीबीआयच्या समन्सनुसार सकाळी सीबीआय कार्यालयात दाखल झाले. सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना शारदा समूहाचा प्रमुख सुदीप्तो सेन याच्याशी केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीसाठी बोलावले होते. ‘एखाद्याशी व्यावसायिक संबंध ठेवणे हा काही गुन्हा नाही. आपण सुदीप्तो सेन यांना अजिबात ओळखत नाही,’ असे मतंग सिंग यांनी सीबीआय कार्यालयात जाण्याआधी पत्रकारांना सांगितले होते. (वृत्तसंस्था)४ओडिशातील मायक्रो फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या १४ ठिकाणांवर सीबीआयने शनिवारी छापे घातले. सीबीआयतर्फे चौकशी करण्यात येत असलेल्या ४४ चिटफंड कंपन्यांमध्ये मायक्रो फायनान्स लिमिटेडचा समावेश आहे. कंपनी ज्या ठिकाणी व्यापार करीत आहे, त्या सर्वच ठिकाणी हे छापे घालण्यात आले आहेत. यात कंपनीच्या भुवनेश्वर, कटक आणि बेहरामपूर येथील कार्यालयांचा समावेश आहे, अशी माहिती सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासोबतच मायक्रो फायनान्स लिमिटेडचे माजी प्रबंध संचालक दुर्गाप्रसाद मिश्रा, संचालक अशोक पटनायक आणि अन्य संचालकांच्या निवासस्थानीही छापे घालण्यात आल्याचे वृत्त आहे.