शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेचे माजी अध्यक्ष बलराम जाखड यांचे निधन

By admin | Updated: February 4, 2016 02:59 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. बलराम जाखड यांचे बुधवारी सकाळी ७ वाजता दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. बलराम जाखड यांचे बुधवारी सकाळी ७ वाजता दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. मस्तिष्काघातामुळे ते आजारी होते. गेल्या महिन्यापासून त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या मागे दोन पुत्र, दोन कन्या आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. पंजाबच्या अबोहरजवळील पंचकोसी या मूळ गावी उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री आणि विविध पदांवर काम करताना त्यांनी भरीव योगदान दिले. १९८० ते ८९ या काळात लोकसभेचे अध्यक्ष असताना संसदेत संग्रहालय उभारण्यात, तसेच सभागृहाच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. सर्वमान्य नेते म्हणूनच नव्हे, तर विरोधकाकडूनही ते प्रशंसेस पात्र ठरले होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात १९९१ मध्ये ते कृषिमंत्री राहिले होते. त्यांनी ३० जून २००४ ते ३० मे २००९ या काळात मध्यप्रदेशचे राज्यपालपद भूषविले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)