शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

माजी कोळसा सचिव गुप्ता यांची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 05:01 IST

कोळसा खाण वाटपाशी संबंधित प्रकरण

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपाशी संबंधित प्रकरणात आरोप सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरल्याचे मत नोंदवत येथील एका न्यायालयाने गुरुवारी माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि दिल्लीतील एका कंपनीची मुक्तता केली आहे.

विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी स्पष्ट केले की, गुप्ता आणि दिल्लीस्थित पुष्प स्टिल्स अ‍ॅण्ड माइनिंग प्रा. लि. विरुद्ध विविध आरोप सिद्ध करण्यात सीबीआय दयनीय पद्धतीने अपयशी ठरली आहे. गुप्ता हे ३१ डिसेंबर २००५ ते नोव्हेंबर २००८ पर्यंत कोळसा सचिव होते. हे प्रकरण कंपनीला कोळसा खाण वाटपाच्या कथित अनियमिततेशी संंबंधित होते. कंपनीला स्क्रिनिंग कमिटीच्या शिफारशीच्या आधारे छत्तीसगडमधील ब्रह्मपुरी कोळसा खाण देण्यात आली होती.

न्यायालयाने म्हटले आहे की, दोन्ही आरोपींविरुद्ध करण्यात आलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाही. फिर्यादी पक्ष कोणतेही आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे गुन्हेगारी कट, गुन्हेगारी गैरवर्तन, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सरकारी नोकरदाराकडून दंडनीय विश्वासघात अशा आरोपात दोन्ही आरोपींची निर्दोष मुुक्तता करीत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

कंपनीने कोळसा खाणीसाठी अर्ज करताना वस्तुस्थिती चुकीच्या पद्धतीने सांगितली, असा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला होता. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. रजत माथूर यांनी आरोप नाकारले व सीबीआयचे हे प्रकरण ‘खोटे’ असल्याचा दावा केला होता. कंपनीने खाणकाम सुरू करण्यासाठी आवश्यक तेवढे भांडवल व अनुभव नसताना छत्तीसगड सरकारने केलेल्या शिफारशीच्या आधारे खाणीचा भाडेपट्टा मिळवला होता, असा आरोप सीबीआयने केला होता. सीबीआयने आधी ब्रह्मपुरी कोळसा खाणीचे वाटप खोट्या माहितीच्या आधारावर केले गेले होते, असा दावा केला होता. कंपनीने लोखंडाच्या खाणीचा भाडेपट्टा नसतानाही तो असल्याची खोटी माहिती दिली होती. कंपनीला पोलाद उत्पादनात काहीही अनुभव नव्हता व गु्रप कंपनीज/ कंपन्या (फर्म्स) यांची निव्वळ किंमत सुमारे ३.०१ कोटी रुपये होती व ती नगण्य होती, असाही आरोप होता.