शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

माजी सरन्यायाधीशांचा ‘तो’ वादग्रस्त निकाल मागे

By admin | Updated: April 12, 2016 02:32 IST

देशातील खासगी व अल्पसंख्य संस्थांसह सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी व आणि पदव्युत्तर प्रवेशांसाठी संपूर्ण देशाच्या पातळीवर एकच सामाईक पात्रता व प्रवेश

नवी दिल्ली : देशातील खासगी व अल्पसंख्य संस्थांसह सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी व आणि पदव्युत्तर प्रवेशांसाठी संपूर्ण देशाच्या पातळीवर एकच सामाईक पात्रता व प्रवेश परीक्षा (नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट-एनईईटी) घेण्याचा मेडिकल कौन्सिलचा निर्णय घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याचा तीन वर्षांपूर्वी स्वत:च दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मागे घेतला. परिणामी आगामी शैक्षणिक वर्षांत ही परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजसह देशभरातील अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी केलेल्या याचिका मंजूर करून तत्कालिन सरन्यायाधीश न्या. अल्तमास कबीर यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने २:१ अशा बहुमताने हा निकाल १८ जुलै २०१३ रोजी दिला होता. सरन्यायाधीश न्या. कबीर यांच्या निवृत्तीच्या दिवशीच हा निकाल दिला गेला होता. त्यात स्वत: न्या. कबीर यांनी व न्या. विक्रमजीत सेन यांनी परीक्षेच्या विरोधात तर न्या. अनिल आर. दवे यांनी परीक्षेच्या बाजूने निकाल दिला होता.या निकालाचा फेरविचार करण्यासाठी भारत सरकार व मेडिकल कौन्सिलने लगेचच ‘रिव्ह्यू पिटिशन’ केल्या होत्या. मध्यंतरी या फेरविचार याचिका तीनऐवजी पाच न्यायाधीशांच्या पूर्णपीठाकडे वर्ग केल्या गेल्या होत्या. नियमानुसार मूळ निकाल देणारे सर्व न्यायाधीश उपलब्ध नसतील तर उपलब्ध असलेल्या न्यायाधीशांपुढे किवा त्यापैकी एका तरी न्यायाधीशाने फेरविचार याचिकांवर सुनावणी करावी लागते. मूळ निकाल देणाऱ्यांपैकी आता फक्त न्या. दवे उपलब्ध असल्याने त्यांच्यासह न्या. ए. के. सिक्री, न्या. आर. के. अगरवाल, न्या. आदर्श कुमार गोयल व न्या. आर. भानुमती यांच्या पूर्णपीठाने फेरविचार याचिकांवर सुनावणी करून मूळ निकाल मागे घेतला आणि वेल्लोर कॉलेजसह इतर याचिकांवर पूर्णपणे नव्याने सुनावणी घेण्याचा आदेश दिला. निकाल मागे घेण्यासाठी पूर्णपीठाने जी कारणे दिली ती केवळ महत्वाची नव्हे तर ऐतिहासिकही म्हणावी लागतील. नव्याने होणाऱ्या सुनावणीत कोणत्याही पक्षाची बाजू पूर्वग्रहदूषित होऊ नये म्हणून सविस्तर समीक्षा न करता न्यायालयाने दोन कारण नमूद केली. एक, आधीचे बहुमताचे निकालपत्र संबंधित मुद्द्यांवरील पूर्वीच्या बंधनकार अशा निकालांचा विचार न करता दिले गेले होते. दोन, नेहमीच्या प्रथेला बाजूला ठेवून त्या निकालपत्रावर न्यायाधीशांमध्ये आधी आपसात विचार-विनिमय केला गेला नव्हता व निकालपत्राचा कच्चा मसुदा न्यायाधीशांमध्ये वाचण्यासाठी वितरितही केला गेला नव्हता.विशेष म्हणजे न्या. दवे यांनी आधीच्या निकालपत्राच्या वेळीही अल्पमताचा निकाल लिहिताना न्यायाधीशांमध्ये आपसात चर्चा न झाल्याचे व तरीही सरन्यायाधीशांच्या निवृत्तीमुळे वेळ नसल्याने आपण नाईलाजाने या निकालपत्रात सहभागी होत असल्याचे नमूद केले होते. नियतीचा खेळ असा की, ज्या न्या. दवे यांना आधी अल्पमतात असल्याने गप्प बसावे लागले होते त्यांनीच आता तीन वर्षांनी इतर न्यायाधीशांच्या सहमतीने पूर्वी आपल्याला न पटलेला निकाल मागे घेतला.निकाल आधीच फुटला होताजो निकाल आता मागे घेण्यात आला तो केवळ सरन्यायाधीशांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी दिला गेला म्हणून नव्हे तर अन्य कारमानेही वादग्रस्त ठरला होता. सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाने त्या दिवशी प्रत्यक्ष निकाल ोहण्याच्या आधीच निकाल काय होणार याचे अचूक भाकित करणारी माहिती सोशल मीडियावर टाकली होती.