शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

माजी अरुणाचल मुख्यमंत्र्यांचा आत्महत्येपूर्वी ६० पानी ‘ बॉम्ब’!

By admin | Updated: February 18, 2017 22:03 IST

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या नोटमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांवर कोट्यवधी रुपयांची लांच घेतल्याचा आरोप केला.

चौकशीची मागणी: न्यायाधीश, काँग्रेस नेत्यांवार पैसे खाल्ल्याचा आरोप

नवी दिल्ली, दि. १८ - अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी गेल्या आॅगस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानात गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी एक ६० पानी सविस्तर टिप्पण लिहून ठेवले होते व त्यात सर्वोच्च न्यायालायच्या आजी-माजी न्यायाधीशांसह अनेक काँग्रेस नेत्यांवर कोट्यवधी रुपयांची लांच घेतल्याचा आरोप केला होता, अशी माहिती आता बाहेर आली आहे.गेल्या ९ आॅगस्ट रोजी पुल यांनी छताच्या पंख्याला फास घेऊन आत्महत्या केली तेव्हा अरुणालच प्रदेश पोलिसांना पूल यांनी ‘मेरे विचार’ या शीर्षकाने लिहिलेले हे हिंदी टिप्पण पोलिसांना मिळाले होते. या टिप्पणाच्या प्रत्येक पानावर पुल यांची स्वाक्षरी आहे व त्यांनी बहुधा महिनाभराचा वेळ घेऊन ते लिहिल्याचे तारखांवरून स्पष्ट होते.दिवंगत पुल यांच्या पहिल्या पत्नी दांगविमसाई यांनी या टिप्पणाच्या अनुषंगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी सीबीआय किंवा राष्ट्रीय तपासी यंत्रणा यासारख्या केंद्रीय संस्थेने तपास करण्याची मागणी केली. या टिप्पणात नामोल्लेख केलेल्या प्रत्येक न्यायाधीशाला व राजकीय नेत्याला ‘प्रकाशात’ आणून लांच घेतल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जावी, असे त्या म्हणाल्या.पुल यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी नोंदविलेल्या फिर्यादीचा राज्य सरकारने योग्यपणे तपास न केल्याने नवा एफआयआर नोंदवून तपास केला जावा, अशीही त्यांनी मागणी केली. सीबीआय तपासाची मागणी न करण्यासाठी विद्यमान राज्य सरकाकडून आपल्याला धमकावले, असाही त्यांनी आरोप केला.

पुल यांचे काही धक्कादायक आरोप

- माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांना दोषी ठरवून सीबीआय तपासाच्या गुवाहाटी उच्च न्यायालायच्या निकालास स्थगिती देण्यासाठी माजी सरन्यायाधीश एच. एल. दत्तु यांना २८ कोटी रुपये देण्यात आले.- माजी सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांनी पैसे खाऊन अरुणाचलमधील रेशन घोटाळ्यात कंत्राटदारांच्या बाजूने निकाल दिला.- आताचे सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहार यांचे नातेवाईक विरेंद्र केहार याने माझ्याकडे ४९ कोटी रुपयांची तर आणखी एक न्यायाधीश दीपक मिश्रा यांचे नातेवाईक आदित्य मिश्रा यांनी ३७ कोटी रुपयांची मागणी केली होती.- सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निकालाने मुख्यमंत्रीपद गेले तो निकाल व्हायच्या झाल्यानंतरही निकाल बदलण्यासाठी पैसे मागण्यासाठी काही लोकांनी संपर्क साधला. या केससाठी झालेला सर्व ९० कोटी रुपयांचा खर्च तुकी व खंडू या आजा-माजी मुख्यमंत्र्यांनी केला.- त्यावेळचे केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अरुणाचल प्रदेशला २०० कोटी रुपयांचे अग्रिम कर्ज मंजूर केल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री दोरजी खंडू यांच्या सांगण्यानुसार ६ कोटी रुपये मुखर्जी यांना नेऊन दिले.- सन २००८ मध्ये काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा यांना ३७ कोटी रुपये देण्यास खंडू यांनी अपल्याला भाग पाडले.- अरुणाचलमधील काँग्रेस आमदारांमधील बंडखोरी मिटविण्यासाठी कपिल सिब्बल, कमल नाथ, गुलाम नबी अझाद, सल्मान खुर्शिद व व्ही. नारायणस्वामी या केंद्रीय काँग्रेस नेत्यांनी पैशाची मागणी केली.

(लोकमत न्यूज नेटवर्क)