शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

टिश्यू कल्चर नर्सरीतून दुर्मीळ रोपांची निर्मिती सामाजिक वनीकरण : बांबू, वड, चंदनाच्या दुर्मीळ रोपांची निर्मिती

By admin | Updated: August 9, 2016 22:03 IST

जळगाव : सामाजिक वनीकरण विभागातर्फे कुंभारखोरी भागात ३ हेक्टर क्षेत्रात हायटेक नर्सरी साकारण्यात येत आहे. प्रत्येक वर्षाला यात पाच लाख दुर्मीळ रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे.

जळगाव : सामाजिक वनीकरण विभागातर्फे कुंभारखोरी भागात ३ हेक्टर क्षेत्रात हायटेक नर्सरी साकारण्यात येत आहे. प्रत्येक वर्षाला यात पाच लाख दुर्मीळ रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे.
बांबू वनात विविध प्रजातींची लागवड
कोल्हे हिल्स परिसरातील कुंभारखोरी भागातील १५ हेक्टर क्षेत्रावर जैव विविधता उद्यान तयार केले जात आहे. या उद्यानांतर्गत बांबू वन उभारण्यात येणार आहे. यात बांबूसा टुल्डा, बांबूसा बाल्कोआ, बांबूसा बांबोस, बांबूसा न्यूटन्स, बांबूचा व्हल्गॅरीस, डेण्ड्रोकॅलॅमस हॅमिल्टोनी, बांबूसा पलिडा, डेण्ड्रोकॅलॅमस जिजेंटस, डेण्ड्रोकॅलॅमस अस्पर, डेण्ड्रोकॅलॅमस स्ट्रक्टिस या प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे.
टिश्यूच्या माध्यमातून ५ लाख रोपांची लागवड
या हायटेक नर्सरीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला ५ लाख रोपांची निर्मिती करता येणार आहे. या नर्सरीत जी रोपे दुर्मीळ आहेत त्यांचे प्रोटोकॉल तयार करून रोपांची उगवन करण्यात येणार आहे. यात वड, चिंच, साग, बांबू, टेकोमा, ड्रेसिना, पायकस, उंबर, बांबू, कडुनिंब यांची निर्मिती करता येणार आहे.

बांबूच्या रोपांसाठी हायटेक नर्सरी ठरणार वरदान
बांबूच्या रोपांच्या निर्मितीसाठी सामाजिक वनीकरण विभागाला मोठे कष्ट करावे लागतात. ४० ते ५० वर्षातून एकाच वेळी या झाडांचा फुले येत असतात. त्यानंतर दुसर्‍या वर्षी हे बांबूचे झाड सुकते. बांबूच्या रोपाच्या निर्मितीसाठी टिश्यू कल्चरद्वारे निर्मिती हे वरदान ठरणार आहे. चंदन, वड,सागाच्या झाडासाठी ही नर्सरी महत्त्वपूर्ण असणार आहे.
सव्वा कोटींचा खर्च अपेक्षित
हायटेक नर्सरीसाठी तीन हजार स्केअर फुटाची टिश्यू कल्चर लॅब तयार करण्यात येणार आहे. ही संपूर्ण लॅब ही वातानुकुलित असणार आहे. यात पाच हजार स्केअर फुटाचे पॉलिहाऊस राहिल. १ हेक्टरवर शेड नेट हाऊस तयार करण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कुंपणाचे कामदेखील झाले आहे. पॉलीहाऊसच्या कामालादेखील सुरुवात झाली आहे.
बिलाखेडचा जैव विविधता उद्यानाचा आराखडा तयार
चाळीसगाव शहरालगत बिलाखेड जैव विविधता उद्यानाचा आराखडा सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक एस.डी.वाढई यांनी तयार केला आहे. यात राशी चिन्हानुसार झाडे, नवग्रहांची झाडे, अशोका वन, बांबू वन, नक्षत्र वन, नंदनवन, गणेश वन तयार होणार आहे.