शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी मतभेद विसरा

By admin | Updated: February 9, 2015 06:19 IST

विकास, रोजगारनिर्मिती आणि गुंतवणूकचक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मतभेद विसरत एकजुटीने काम करावे,

नवी दिल्ली : विकास, रोजगारनिर्मिती आणि गुंतवणूकचक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मतभेद विसरत एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नीति आयोगाच्या संचालन परिषदेच्या पहिल्या बैठकीला संबोधित करताना केले. तसेच राज्यांना अधिक निधी व त्याच्या वापराचे जादा अधिकार दिले जातील, असेही पंतप्रधानांनी सांगितले.प्रकल्पांच्या मंदगतीला कारणीभूत घटकांवर मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे व प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देतानाच त्यासंबंधी प्रलंबित मुद्द्यांचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक राज्याने खास अधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपवावी, असेही पंतप्रधानांनी सुचविले. गरिबी हे देशातील सर्वांत मोठे आव्हान असून, नवगठित नीति आयोग सहकार्य आणि स्पर्धात्मक सांघिकतेचे आदर्श घालून देतो, असेही ते म्हणाले. सहा दशकांपूर्वीच्या योजना आयोगाची जागा नव्या भारत परिवर्तन राष्ट्रीय संस्थेने (नीति आयोग) घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांसाठी बौद्धिक संस्थेच्या रूपात हा आयोग काम करणार असून, धोरणात्मक मार्गदर्शनही करेल. पंतप्रधान हे या आयोगाचे अध्यक्ष आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)> केंद्राच्या काही योजना राज्यांकडे वर्ग करणारकेंद्र सरकारच्या शंभरहून अधिक योजनांसाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ३.३८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी काही योजना राज्यांकडे वर्ग करण्याचे सूतोवाच मोदी यांनी केले. यापैकी ६६ योजनांचे सुसूत्रीकरण करून त्यापैकी कोणत्या सुरू ठेवायच्या, कोणत्या राज्यांकडे वर्ग करायच्या आणि कोणत्या योजनांना कात्री लावायची यावर विचार करण्यासाठी नीति आयोगांतर्गत मुख्यमंत्र्यांचा एक उपगट स्थापन केला जाईल, असेही मोदी यांनी सांगितले. सर्वांसाठी एकाच प्रकारची योजना, या मानसिकतेतून बाहेर पडून राज्यांची गरज व योजना यांच्यात समन्वय साधण्यात येईल, यावर त्यांनी भर दिला.