शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ खात्यातील २ अब्ज डॉलर्सचा विसर

By admin | Updated: March 7, 2016 03:03 IST

विदेशी लष्करी विक्री कार्यक्रमांतर्गत अमेरिकेला दिलेली २.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची रक्कम कोणत्याही व्याजाविना अमेरिकेच्या खात्यात पडून असल्याचे आढळून आले आहे.

नवी दिल्ली : विदेशी लष्करी विक्री कार्यक्रमांतर्गत अमेरिकेला दिलेली २.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची रक्कम कोणत्याही व्याजाविना अमेरिकेच्या खात्यात पडून असल्याचे आढळून आले आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी ही माहिती उघड केली.अमेरिकेसोबत आता आर्थिक व्यवहार प्रक्रियेत चांगला सूर जुळला असून प्रत्येक तीन महिन्यांत लष्करी खरेदीसंबंधी बिले निघत आहेत. विविध खरेदीच्या रकमा एकाच निधीत जमा होतात. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हा निधी तयार करण्यात आला, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. मंत्रालयाने पडून असलेल्या सदर रकमेबाबत निवेदन जारी केले असून कंत्राटासंबंधी औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम काढून घेतली जाणार असल्याचे त्यात स्पष्ट केले आहे. रक्कम खात्यात पडून असल्यामुळे २०१५-१६ या वर्षातील गत सहा महिन्यांत कंत्राटाबाबत रक्कम देण्याची आवश्यकता भासली नव्हती.