शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

रणरणत्या उन्हात वन्यप्राण्यासाठी पाणवठ्यांचा आधार यावल वनविभाग : १५ पाणवठे व १०८ सिमेंट बांधची निर्मिती

By admin | Updated: April 24, 2016 00:39 IST

जळगाव : जिल्हाभरात दिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत आहे. दुष्काळीस्थिती, जंगलात पाण्याचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे वन्यजीवांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी यावल वनविभागातर्फे १५ पाणवठे तयार केले आहेत. तर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १०८ सिमेंट बांध तयार करण्यात आले आहे.

जळगाव : जिल्हाभरात दिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत आहे. दुष्काळीस्थिती, जंगलात पाण्याचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे वन्यजीवांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी यावल वनविभागातर्फे १५ पाणवठे तयार केले आहेत. तर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १०८ सिमेंट बांध तयार करण्यात आले आहे.
चिंकारा, रानडुक्कर, अस्वलांचा संचार
तापमान सतत वाढत असताना तहान भागवणारे हे पाणवठे वन्य प्राण्यांसाठी वरदानच ठरत असतात. सातपुड्याच्या कुशीत असलेल्या यावल वनविभागात २८४४.४४ चौ.कि.मी.वनक्षेत्र आहे. त्यात ६४ गावांच्या परिसरात ८९७.०५ चौ.कि.मी.क्षेत्रात यावल वनविभागाचे क्षेत्र आहे. तर वन्यजीव विभागाचे १७५.५८ चौ.कि.मी.वनक्षेत्र आहे. सर्व बाजूने वेढलेल्या जंगलात ससा, कोल्हा, लांडगा, चिंकारा, भेडकी, रानडुक्कर, अस्वल, मोर, चितळ, बिबट, तडस या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असतो.

नदी-नाले कोरडे ठाक
यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे नदी-नाले कोरडे पडले आहेत. अशात जंगलात रहाणार्‍या वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि ही जंगली श्वापदे गावाच्या दिशेने वळायला लागतात. पाण्याच्या शोधात जनावरे विहिरीत पडल्याच्या घटनाही अनेकदा घडतात. तहानेने व्याकूळ श्वापदांना वन्य विभागाने कृत्रिम पाणवठे तयार करून पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. या पाणवठ्यांवर कुठे बोरवेल मधून तर कोठे टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

जलयुक्त शिवार अंतर्गत १०८ सिमेंट बांध
कृत्रिम पाणवठ्यांसोबत यावल वनविभागातर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत वनक्षेत्रात सिमेंट नाला बांध तयार करण्यात येत आहेत. त्यात रावेर तालुक्यातील वनक्षेत्रात ८३, चोपडा तालुक्यात २१ तर यावल तालुक्यात ४ सिमेंट नाला बांध तयार करण्यात आले आहेत.

१५ ठिकाणी कृत्रिम व नैसर्गिंक पाणवठे
प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागातर्फे तब्बल १५ ठिकाणी पानवठे तयार करण्यात आले आहे. त्यात वैजापूर वनक्षेत्रातील मालापूर, खार्‍यापाडा पश्चिम, देवझिरी - हंड्याकुंड्या, रावेर- पाल, चोपडा -सत्रासेन, चौगांव उ., मोरचिडा, कर्जाणा- वर्डी, यावलपूर्व- डोंगरकठोरा भागात पाच पानवठे तयार केले आहेत. तर यावल पश्चिम वनक्षेत्रातील मनुदेवी पश्चिम वाघझिरा येथे पाणवठा तयार केला आहे.

कोट
दुष्काळीस्थिती आणि वाढते तापमान या गोष्टी लक्षात घेऊन यावल वनक्षेत्रात १५ पाणवठे व १०८ सिमेंट नालाबांध तयार करण्यात आले आहे. यासह नैसर्गिक पाणवठे तयार करून त्यात वन्यप्राण्यांसाठी पाणी साठविले जात आहे.
एस.एस.दहिवले, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग.