शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

परदेशींना कर भरावाच लागेल

By admin | Updated: May 16, 2016 03:48 IST

परदेशी गुंतवणुकदारांना भारतात केलेल्या कमाईवर कर भरावाच लागेल ही बाब टप्प्याटप्याने आता अनिवार्य करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : परदेशी गुंतवणुकदारांना भारतात केलेल्या कमाईवर कर भरावाच लागेल ही बाब टप्प्याटप्याने आता अनिवार्य करण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्था आज इतकी मजबूत आहे की परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी करात सूट देणारे देश अवलंबितात त्या त्या मार्गांची त्याला गरज नाही, असे मत केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांनी रविवारी पत्रकारांसमोर व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देतांना जेटली म्हणाल यांनी सांगितले की, भारतात गेल्या १५ वर्षात २७८ अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास १९ लाख कोटींची परदेशी गुंतवणूक आली. त्यापैकी ३३ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक मॉरिशस मार्गे भारतात आली. जेटली म्हणाले की, भारताने यापूर्वी दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी ज्या देशांशी करार केले, त्यात आवश्यक सुधारणा करून कडक धोरण राबविण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी याआधी मॉरिशससोबत १९८३ मध्ये झालेल्या करारातही आवश्यक दुरुस्त्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे राऊंड ट्रिपिंगच्या जुन्या तक्रारींचे तर निवारण होईलच याखेरीज १ एप्रिल २0१७ पासून भारतीय कंपनीच्या समभाग विक्रीतून होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर आकारण्याचा अधिकारही सरकारला प्राप्त होणार आहे, असे वित्तमंत्र्यांनी सांगितले. जेटली म्हणाले, १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत संक्रमण काळापुरती प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना करामधे ५0 टक्के सूट (लिमिटेड आॅफ बेनिफिटस) मिळेल. मात्र आर्थिक वर्ष २0१९/२0 पासून मात्र मॉरिशसमार्गे गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनाही भारतीय कर आकारणीच्या दरानुसार कर भरावा लागेल. (विशेष प्रतिनिधी)भीती अनाठायीपरदेशी गुंतवणुकीच्या नव्या धोरणानुसार सरकारला कर चोरी रोखणे, दुहेरी कर आकारणीतून वाचणे, विविध देशांकडून येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीला तसेच माहितीच्या आदान प्रदानाला अधिक वेग देणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे भारतीय करप्रणालीतही अधिक पारदर्शकता येईल. तथापि परदेशी गुंतवणूकदार या निर्णयामुळे लगेच भारत सोडून अन्य करमुक्त देशांचा मार्ग गाठतील, ही भीती मात्र अनाठायी आहे. भारतातल्या परदेशी गुंतवणुकीवर सरकारच्या ताज्या निर्णयांचा विपरित परिणाम होणार नाही असेही जेटलींनी स्पष्ट केले.