शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विदेशवारी करणाऱ्यांना भरावा लागेल आयकर रिटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 05:14 IST

बजेटमध्ये प्रस्ताव : वार्षिक १ लाख वीजबिल भरणाऱ्यांनाही अनिवार्य

नवी दिल्ली : आपण जर विदेश दौºयावर दोन लाखांपेक्षा अधिक खर्च केला असेल किंवा आपले वीज बिल वर्षात एक लाखांपेक्षा अधिक असेल अथवा आपण वर्षभरात बँकेत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली असेल, तर भलेही आपले उत्पन्न वार्षिक पाच लाखांपेक्षा कमी असेल, तरीही आपल्यासाठी आयकर रिटर्न दाखल करणे अनिवार्य असेल. २०१९- २० च्या बजेटमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

या तीन प्रस्तावांनुसार, जर त्या व्यक्तीचे वार्षिक करपात्र उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल, तरी त्या व्यक्तीला आयकर विवरण देणे अनिवार्य असणार आहे. आयकर अधिनियमाच्या कलम ५४ नुसार दीर्घकालीन भांडवली लाभावर कर सूट देण्याचा दावा करणाºया व्यक्तींनाही आयकर विवरण देणे अनिवार्य असेल. सध्या अशा प्रकारचे लाभ घर, बाँड यासारख्या संपत्तीत गुंतवणुकीवर आयकरातून सूटच्या स्वरूपात मिळतात. यासाठी आयकर विवरण दाखल करावे लागत नाही. या सर्व दुरुस्त्या १ एप्रिल, २०२० पासून लागू असतील आणि २०२०-२१ आणि त्यानंतरच्या मूल्यांकन वर्षांपासून अंमलबजावणी होईल.

देशातील नगदी देवाणघेवाण मर्यादित करण्यासाठी आयकर अधिनियमामध्ये एक नवे कलम १९४ एन जोडण्याचा प्रस्ताव आहे. यानुसार, एखाद्या व्यक्तीने बँकेत अथवा सहकारी बँकेत किंवा पोस्ट आॅफिसमध्ये वर्षभर एक कोटी रुपयांपेक्षा अधिक नगदी रक्कम काढून घेतली, तर दोन टक्के दराने यावर कपात करण्याचा प्रस्ताव आहे. ही तरतूद सरकार, बँकिंग कंपनी, बँकिंग कार्यातील सहकारी समिती, पोस्ट आॅफिस, बँकिंग प्रतिनिधी आणि व्हाइट लेबल एटीएम संचलन करणाºया युनिटसाठी लागू असणार नाही. कारण व्यवसायानिमित्त त्यांना मोठ्या प्रमाणात नगदी रकमेचा वापर करावा लागतो.अधिक रक्कम खात्यात जमा केली तर...बजेटसोबत प्रस्तुत अर्थ विधेयकात आयकर अधिनियमाच्या कलम १३९ मध्ये काही दुरुस्ती प्रस्ताव आहेत. या अंतर्गत निश्चित रकमेपेक्षा अधिक रकमेची देवाणघेवाण केल्यास आयकर रिटर्न दाखल करणे अनिवार्य असणार आहे. यानुसार, जर एखादी व्यक्ती एक वर्षात एखाद्या बँकिंग कंपनी अथवा सहकारी बँकेत एका किंवा त्यापेक्षा अधिक चालू खात्यात एकूण एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करत असेल, तर त्या व्यक्तीला आयकर विवरण देणे अनिवार्य असणार आहे.एखादी व्यक्ती स्वत:च्या किंवा अन्य व्यक्तीच्या विदेश यात्रेवर एकूण दोन लाखांपेक्षा अधिकचा खर्च करत असेल, तर त्यांना आयकर विवरण द्यावे लागेल.याशिवाय, एखाद्या व्यक्तीचे वार्षिक वीजबिल एकूण एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, तर त्या व्यक्तीला आयकर रिटर्न दाखल करावा लागेल.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019