शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परदेशवारीची ‘पोस्ट’ प्राप्तिकराच्या रडारवर

By admin | Updated: May 23, 2016 05:12 IST

सध्या सोशल मीडियाचा वापर खूपच वाढला असून, कोणत्याही सेलीब्रेशनची छायाचित्रे लगेचच सोशल मीडियावर टाकण्याची अनेकांना घाई झालेली असते.

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचा वापर खूपच वाढला असून, कोणत्याही सेलीब्रेशनची छायाचित्रे लगेचच सोशल मीडियावर टाकण्याची अनेकांना घाई झालेली असते. अनेक जण पर्यटनस्थळी किंवा पिकनिकला गेल्यानंतर तिथले फोटो फेसबुकवर पोस्ट करतात. मात्र असे फोटो पोस्ट कराल, तर यापुढे कदाचित अडचणीत याल; कारण तुमच्या फेसबुक अकाउंटवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर असू शकेल. विशेषत: तुम्ही फॉरेन टूरची छायाचित्रे पोस्ट केलीत, तर तुम्हाला हा पैसा आला कोठून, अशी नोटीस प्राप्तिकर विभागाकडून येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मुंबई, दिल्ली, चेन्नई अशा महानगरांतील वा मोठ्या शहरांतील करदात्यांना असा अनुभव आलेला नाही. पण निमशहरी, ग्रामीण भागातील करदात्यांच्या फेसबुक पोस्टवर लक्ष ठेवले जात आहे. पश्चिम बंगालच्या आसनोलमध्ये राहणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटला त्याच्या परदेशवारीच्या छायाचित्रांमुळे हा अनुभव आला. त्याने फॉरेन टूरची फेसबुकवर पोस्ट केलेली छायाचित्रे पाहून त्याच्याकडे विचारणा झाली. अर्थात फेसबुक पोस्टवर अशा ऐशआरामाची छायाचित्रे दिसल्याने त्यावरून कोणताही निष्कर्ष काढणे वा त्याआधारे करदात्यांना त्रास देणे हा प्राप्तिकर विभागाचा हेतू नव्हता. मात्र, यावरून खरे उत्पन्न जाणून घेण्याचा विचार आहे. अनेक करदाते प्रत्यक्षात आपले उत्पन्न कमी दाखवून, करही कमीच भरतात. त्यासाठी व्यवसायातील मंदी किंवा अन्य कारणे दिली जातात. पण हीच मंडळी सहकुटुंब परदेशी सहलीला जातात, तिथे मोठ्या हॉटेलांमध्ये उतरतात, मोठ्या वस्तू खरेदी करतात आणि या साऱ्याची छायाचित्रे नातेवाईक व मित्रांना पाहायला मिळावीत, यासाठी फेसबुकवर पोस्ट करतात. कमी उत्पन्नाचे कारण दाखवून करचुकवेगिरी केल्याची शंका प्राप्तिकर विभागाला यामुळे येत आहे. त्यासाठीच फेसबुकवर नजर ठेवण्याचे त्यांनी ठरवले असल्याचे कळते.