शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उपग्रहाद्वारे पीक नासाडीचा अंदाज

By admin | Updated: November 6, 2015 01:30 IST

दुष्काळाचा आढावा घेण्याबरोबर वैज्ञानिक पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान पडताळणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे सर्वच राज्यांसमोर आव्हान आहे,

- राजू नायक,  नवी दिल्लीदुष्काळाचा आढावा घेण्याबरोबर वैज्ञानिक पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान पडताळणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे सर्वच राज्यांसमोर आव्हान आहे, अशी माहिती विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) आयोजित केलेल्या ‘वातावरण बदल’ या विषयावरील पत्रकारांच्या कार्यशाळेत देण्यात आली.‘तीव्र हवामानाच्या घटना व आपत्तींशी मुकाबला’ या विषयावरील चर्चासत्रात सीएसईचे संशोधक अर्जुन श्रीनिधी म्हणाले, ‘महाराष्ट्र आता सतत सहावेळा दुष्काळाचा सामना करीत असून, पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उपग्रह छायाचित्रांचा वापर महाराष्ट्र सुरू करणार आहे. महाराष्ट्रात प्रायोगिक पद्धतीने उपग्रह कसा काम करतो याची पडताळणी केल्यानंतर, याच कामासाठी निर्धारित काही उपग्रह उपयोगात आणले जाण्याची शक्यता आहे,’ असे श्रीनिधी यांनी सांगितले.दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी उपायउपग्रहांचा वापर करून नुकसानीचा आढावा घ्यावा.पिकांसाठी खास विमा योजना आखून त्याची पारदर्शक व जलद कार्यवाही व्हावी.विम्याचे हप्ते किफायतशीर व सोपे असावेत.विम्याचे हप्ते सवलतीत देण्याची मुभा असावी.शेतकऱ्यांना संस्थात्मक सोपे कर्ज उपलब्ध व्हावे.छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, दुष्काळात सरकारी यंत्रणेने त्यांना तातडीने मदत करावी.पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्युट आॅफ ट्रॉपिकल मेथॉडॉलॉजीचे वैज्ञानिक रॉक्सी मॅथ्यु कॉल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की हवामान खात्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढच्या दहा वर्षांतील हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांकडे कसा पोहोचवावा, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.देशात २०१० पासून अतितीव्र वातावरणामुळे दरवर्षी अंदाजे ३५० दुर्घटना घडतात आणि त्यात हजारो जण मृत्युमुखी पडू लागले आहेत.- चंद्रभूषण,उपसंचालक, सीएसईदेशामध्ये हवामानाचा अंदाज देणाऱ्या खासगी कंपन्या स्थापन होऊ लागल्या असून, विमा कंपन्या पिकांच्या नासाडीचा अंदाज घेण्यासाठी आपल्या फायद्याचा विचार करून खासगी हवामान कंपन्या तैनात करू लागल्या आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सरकारने यात हस्तक्षेप करावा, असे आवाहन त्यांनी केले.- सुनीता नारायण, संचालक, सीएसई