शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

‘ते’१७ दिवस... मोबाईलवर गाणी ऐकत, कुटुंबाशी बोलत कामगारांनी सांभाळले एकमेकांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 08:12 IST

Uttarkashi Tunnel: १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर येत असलेल्या अडचणींची माहिती देण्यात आली नाही. प्रत्येक वेळी त्यांना प्रोत्साहन दिले गेले. ते मोबाईलवर गाणी ऐकत असत. ते फोनद्वारे कुटुंबातील सदस्यांशी बोलू देखील शकत होते. यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासळली नाही.

उत्तरकाशी  - १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर येत असलेल्या अडचणींची माहिती देण्यात आली नाही. प्रत्येक वेळी त्यांना प्रोत्साहन दिले गेले. ते मोबाईलवर गाणी ऐकत असत. ते फोनद्वारे कुटुंबातील सदस्यांशी बोलू देखील शकत होते. यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासळली नाही.

कुटुंबातील सदस्य बोगद्याच्या आत जाऊन अडकलेल्या लोकांशी बोलू शकले. सबा अहमदचा भाऊ नय्यर अहमदने सांगितले की, जेव्हा तो त्याच्याशी बोलायचा तेव्हा तो त्याला समजावून सांगत असे की सर्व काही ठीक चालले आहे.

डॉक्टरांचे पथक सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यांत पाच तास कामगारांशी बोलत होते. डॉ. प्रेम पोखरियाल यांनी सांगितले की, आम्ही प्रत्येक मजुराच्या आरोग्यासंबंधीच्या समस्या ऐकल्या. त्यानुसार औषधे आत पाठवली जात होती. कामगारांना सतत आतमध्ये ओआरएसचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जात  होता. न्याहारी, दुपारचे जेवण आणि  रात्रीचे जेवणही त्यांना वेळेवर पाठवले  जात होते. 

बचावकार्यातील अडचणींवर कशी केली मात?मजुरांशी पहिल्यांदा असा केला संपर्क मजूर बोगद्यात अडकल्यानंतर त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा ही मोठी समस्या होती. वॉकीटॉकीही काम करत नव्हता. बचावपथकाला बोगद्यातून आतून पाणी बाहेर काढण्यासाठी टाकलेला एक ४ इंची पाइप आढळला. पाइपजवळून वॉकीटॉकीद्वारे मजुरांशी संपर्क शक्य झाला. या पाइपद्वारेच मग ऑक्सिजन, औषधे, शेंगदाणे, फुटाणे, आदी वस्तू पाठवण्यात यश आले. 

मलबा काढला की, तेवढाच पडायचासंपर्क झाल्याने मजुरांच्या सुटकेची आशा निर्माण झाली. मलबा काढून मजुरांना बाहेर काढणे एवढी सोपी योजना तेव्हा वाटत होती. ३५ अश्वशक्तीच्या ऑगर मशिनद्वारे मलबा काढण्यास सुरुवात केली; परंतु लगेच बोगद्यातील माती ढासळली. असा प्रकार वारंवार होऊ लागला. ९०० मि.मी. पाइप टाकण्याची युक्ती कामाला आली.

कामाची मंदगती अन् वाढता ताण...- ड्रिलिंग करून ९०० मि.मी. पाइप टाकणे सुरू होते; परंतु या कामाची गती फारच कमी होती. त्यामुळे २५ टन वजनाची अमेरिकी ऑगर मशीन हर्क्युलस विमानाद्वारे घटनास्थळी आणण्यात आली. - २०० अश्वशक्तीची ही मशिन तासात ५ मीटर ड्रिलिंग करू शकत होती, तर आधीची मशीन केवळ १ मीटर. नव्या अजस्र मशिनने काम चोख बजावले. २५ मीटरपर्यंत पाइप टाकण्यात आले.

शेवटचा टप्पा महत्त्वाचा...नऊ दिवस झाले तरी सुटकेच्या दिशेने प्रगती न झाल्याने अखेर ५ बाजूंनी ड्रिलिंगची योजना बनवण्यात आली. ती यशस्वी ठरली.

भविष्यवाणी खरी ठरली...४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यावरून प्रसिद्धीच्या झोतात आलेले या परिसराचे आराध्य दैवत बाबा बौखनाग यांची भविष्यवाणी खरी ठरली. कामगारांना बाहेर काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नात अडथळे येत असल्याचे पाहून बोगद्याशी संबंधित अधिकारी बाबा बौखनाग यांचे स्थान असलेल्या भाटिया गावात पोहोचले आणि कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रार्थना केली होती. त्यावर मजुरांची तीन दिवसांत सुटका होईल, असा आशीर्वाद दिला गेला. त्यानंतर कामात अडथळा आला नाही, तिसऱ्याच दिवशी कामगारांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. बौखनागला या परिसराचे रक्षक मानले जाते.

व्हिडीओ गेम्स खेळण्यासाठी पाठविले मोबाइल...- कामगारांना आधी एनर्जी ड्रिंक्स पाठवण्यात आले, पण नंतर त्यांना पूर्ण जेवण देण्यात आले. कामगार स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आत योगासने करत होते. सकाळ संध्याकाळ बोगद्याच्या आत फिरत होते. - मजुरांना झोपण्यासाठी त्रास झाला असता, परंतु सुदैवाने आतमध्ये जिओटेक्स्टाइल शीट होती, ज्याचा वापर मजुरांनी झोपण्यासाठी केला. त्यांना व्हिडीओ गेम्स खेळण्यासाठी मोबाइल पाठवले होते.

मुलासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवून आला बाप...- बोगद्यात अडकलेल्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी एका वडिलांनी चक्क पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेवत उत्तरकाशी गाठली. मंजित या  कामगाराचे वडील चौधरी म्हणाले की, माझ्या एका मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आता एक बोगद्यात अडकला आहे. त्यामुळे मुलाला नेण्यासाठी सोने गहाण ठेवत येथे आलो. - सोने गहाण ठेवल्याने नऊ हजार रुपये मिळाले. आता २९० रुपये शिल्लक आहेत. मात्र, मुलाला घरी नेण्याचा आनंद सर्वांत मोठा आहे. आज निसर्गही आनंदी दिसत असून थंड वाऱ्याने झाडे, पाने डोलत आहेत. आम्हाला कपडे आणि सामान तयार ठेवण्यास सांगितले होते. - कामगारांना बाहेर काढल्यानंतर आम्हालाही त्यांच्याकडे पाठवण्याची व्यवस्था केली. एक झाड राहिलेले होते ते पुन्हा मिळाले, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ते सतत हाताने डोळे पुसत होते. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

दिवसरात्र ‘परका’ राबला, आता कौतुकाचा वर्षाव...ऑस्ट्रेलियाचे मायक्रोटनलिंग तज्ज्ञ अरनाॅल्ड डिक्स यांना भारत सरकारने सल्लागार म्हणून बचाव कार्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक दिवस आणि रात्र बोगद्याच्या बाहेर बचाव कर्मचार्‍यांसोबत घालवली. मंगळवारी त्यांनी बाबा बौखनाग यांची पूजा केली. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही त्यांचे कौतुक केले.

 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड