शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक 

By मनीषा म्हात्रे | Updated: March 24, 2023 10:32 IST

गावदेवीतील दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ‘फ्रेंच ब्रिज’खाली तब्बल ३ बाय २ फुटांचे भगदाड पाडण्यात आले होते.

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : डोक्यावर छप्पर नाही, त्यात उन्हाळा सुरू होण्याआधीच पाऊस कोसळण्यास सुरुवात झाल्याने उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या एका कुटुंबाने थेट पुलालाच भगदाड पाडून निवारा तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गावदेवीत समोर आला आहे. गावदेवीतील दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ‘फ्रेंच ब्रिज’खाली तब्बल ३ बाय २ फुटांचे भगदाड पाडण्यात आले होते.

एका सुज्ञ नागरिकामुळे हा  प्रकार समोर येताच, पालिका प्रशासनाने तत्काळ हे भगदाड बुजवून पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, गावदेवी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. डी वार्डचे ज्युनियर इंजिनीअर रावसाहेब सांगोलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पुलाला काहींनी भगदाड पाडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्याच, परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाने सतर्क होत पुलाला भगदाड पाडत असताना व्हिडीओ काढून अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यात तीन जण हे भगदाड पाडताना दिसून आले.

हा व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी फ्रेंच पुलाखाली राहून फुलविक्री करणाऱ्या सूरजकुमार राधेलाल यादव (४०), किरण दिलीप कांबळे (२७) आणि निशा संजू थापा (३०) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत नुकत्याच झालेल्या पावसामुळे त्यांनी स्वतःसाठी निवारा व्हावा यासाठी भगदाड पाडल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. 

मोठा अनर्थ टळला गिरगावातून गावदेवी परिसरात जाण्यासाठी फ्रेंच ब्रिजचा वापर होतो. तसेच, वाहनांबरोबर पादचारीही त्याचा वापर करतात. भगदाड पाडण्याचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. 

पुलाखालीच कुटुंब अन् व्यवसाय पुलाच्या भिंतींना लागून दोन्ही बाजूने मोकळा भाग राखून ठेवण्यात आला आहे. फ्रेंच ब्रिजच्या दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या वाटेत काही जणांनी संसार थाटला आहे. तर, काहींनी व्यवसाय सुरू केला आहे.   

अटकेची कारवाई प्राथमिक तपासात, निवाऱ्यासाठीच त्यांनी हा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी तिघांवर अटकेची कारवाई केली असून, अधिक तपास सुरू आहे. - डॉ. अभिनव देशमुख, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २

टॅग्स :Mumbaiमुंबई