शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

युपीए-एनडीएच्या सामन्यात माझा झाला फुटबॉल - विजय मल्ल्या

By admin | Updated: February 3, 2017 15:14 IST

बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यांनी 'निर्दोषत्वचा' सूर आळवला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज  थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यांनी 'निर्दोषत्वचा' सूर आळवत सीबीआय आणि सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. 'युपीए -एनडीएच्या सामन्यात मधल्यामध्ये माझा फुटबॉल झाल्याचे सांगत दाद मागायला अंपायरही नाही' असे ट्विट मल्ल्यांनी केले आहे. तसेच त्यांनी सीबीआयच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 
फरारी कर्जबुडव्यांना देशातील न्यायव्यवस्थेसमोर उभं करण्यासाठी कठोर कायदा लागू करण्याचा उल्लेख अर्थमंत्री अरूण जेटलींनी अर्थसंकल्पादरम्यान केला होता. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या दबावामुळेच मल्ल्यांना ९ हजार कोटींचे कर्ज दिल्याचा आरोपही भाजपाने केला होता. मात्र काँग्रेसने तो आरोप फेटाळून लावला. याच सर्व पार्श्वभूमीवर विजय मल्ल्यांनी ' मी नाही त्यातला' असा आव आणत ट्विटवरुन टीकास्त्र सोडले. 
 
' आता प्रसारमाध्यमांचा वापर खेळपट्टी म्हणून केला जात असून, माझा फुटबॉल बनला आहे. या सामन्यात  एनडीए आणि यूपीए हे दोन संघ खेळत असून दुर्दैवाने दाद मागायला सामन्यात पंचच नाही' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच ' सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे मला धक्काच बसला असून ते सर्व आरोप निराधार आहेत' असेही त्यांनी म्हटले आहे.