शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ॲम्वेकडून सिंहस्थातील बारा हजार पोलिसांना फूडबॅग

By admin | Updated: August 26, 2015 00:19 IST

नाशिक : देशाच्या सीमेवर जवान तर अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही पोलीस यंत्रणा पार पाडत असते़ जनसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणार्‍या पोलिसांप्रती सामाजिक बांधिलकी जपत विविध कंपन्यांनी योगदान दिले आहेत़ कंपन्यांची ही सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका प्रत्येक पोलीस कर्मचार्‍यास कर्तव्याची आठवण करून देईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी केले़ पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि़२५) ॲम्वे इंडिया एंटरप्रायजेस या कंपनीच्या वतीने बारा हजार पोलिसांना देण्यात येणार्‍या फूडबॅगच्या प्रातिनिधीक वितरणप्रसंगी ते बोलत होते.

नाशिक : देशाच्या सीमेवर जवान तर अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही पोलीस यंत्रणा पार पाडत असते़ जनसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणार्‍या पोलिसांप्रती सामाजिक बांधिलकी जपत विविध कंपन्यांनी योगदान दिले आहेत़ कंपन्यांची ही सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका प्रत्येक पोलीस कर्मचार्‍यास कर्तव्याची आठवण करून देईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी केले़ पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि़२५) ॲम्वे इंडिया एंटरप्रायजेस या कंपनीच्या वतीने बारा हजार पोलिसांना देण्यात येणार्‍या फूडबॅगच्या प्रातिनिधीक वितरणप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सिंहस्थासाठी आलेले साधू, महंत तसेच कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे पंधरा हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. शाही पर्वणीच्या कालावधीत अन्न पाण्याची पर्वा न करता त्यांना सुमारे ४८ तास एकाच ठिकाणी उभे राहून कर्तव्य बजवावे लागणार आहेत़ या कालावधीत त्यांना अन्न व पाणी पुरविण्याचा प्रशासनापुढील पेच ॲम्वे कंपनीने सामाजिक बांधिलकीतून सोडविला आहे़ यावेळी कंपनीचे व्यवस्थापक आशिष वैद्य यांनी पोलीस तसेच शासकीय प्रशासनाने सामाजिक सेवेची संधी दिल्यास कंपनी तत्काळ तयार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी पोलीस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त सचिन गोरे, ॲम्वे इंडिया कंपनीचे राज्य मुख्याधिकारी भवानी आयथा, विभाग प्रमुख संदीप प्रकाश, प्रशांत पवार, प्रसिद्धी व्यवस्थापक जिग्नेश शहा तसेच ॲम्वेचे नाशिकमधील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन जी. एस. चौधरी यांनी केले़ सहायक आयुक्त राजू भुजबळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

--इन्फो--
ॲम्वे कंपनीने दिलेल्या या प्रत्येक बॅगेमध्ये एक पाण्याची बाटली, शंभर ग्रॅम चिक्की, डायफ्रुटचे दोन लाडून, बिस्कीटचे दोन पुडे असणार आहे़ विशेष म्हणजे अशा प्रकारच्या बारा हजार बॅगांचे वाटप केले जाणार असून, पोलिसांना ही बॅग पाठीवर अडकविता येणार आहे़

फोटो :- आर / फोटो / २५पोलीस ॲम्वे फोटो या नावाने सेव्ह केला आहे़
सिंहस्थातील बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना ॲम्वे कंपनीने दिलेल्या फूडबॅगचे प्रातिनिधी स्वरूपात वितरण करताना ॲम्वेचे व्यवस्थापक आशिष वैद्य व पोलीस आयुक्त एस़जगन्नाथऩ समवेत अधिकारी वर्ग़