शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
6
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
9
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
10
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
11
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
12
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
13
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
14
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
15
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
16
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
17
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
18
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
20
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

इस्त्रोचे पाऊल पडते पुढे, जीएसएलव्ही मार्क ३ चे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Updated: December 18, 2014 10:43 IST

चार टनाचे उपग्रह नेण्याची क्षमता असलेल्या जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाची गुरुवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली असून मार्क ३ च्या माध्यमातून इस्त्रोने अंतराळ क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले

ऑनलाइन लोकमत 

श्रीहरीकोटा, दि. १८ - मंगळ भरारी घेतल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने गुरुवारी अंतराळ क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गुरुवारी जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपक यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले असून मार्क ३ मुळे इस्त्रोला अंतराळात चार टनचे उपग्रह सोडणे शक्य झाले आहे. तसेच मार्क - ३ च्या यशस्वी चाचणीमुळे मानवाला अंतराळात पाठवण्याच्या मोहीमेतील पहिला टप्पाही पूर्ण  केला आहे. 

मंगल यानाची मोहीम यशस्वी ठरल्यानंतर जीएसएलव्ही मार्क ३ या रॉकेटच्या प्रक्षेपण चाचणीसाठी इस्त्रोने जय्यत तयारी सुरु केली होती. या यानाच्या माध्यमातून मानवरहित अवकाश कुपीचीही चाचणी घेण्यात येणार असल्याने इस्त्रोच्या दृष्टीने हे प्रायोगिक प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे होते. गुरुवारी श्रीहरिकोटा येथील तळावर जीएसएलव्ही मार्क ३ चे यशस्वीरित्या प्रायोगिक प्रक्षेपण करण्यात आले. २० मिनीटांनी अवकाश कुपी बंगालच्या उपसागरात उतरवण्यात आली व इस्त्रोची ही चाचणी यशस्वी झाल्याचे इस्त्रोच्या प्रमुखांनी जाहीर केले. 

जीएसएलव्ही मार्क ३ चे वैशिष्ट्य 

> भारताकडे सध्या दोन टनापेक्षा अधिक वजन असलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची क्षमता नसल्याने इस्त्रोला विदेशातील अंतराळ संस्थावर अवलंबून राहावे लागत होते. आता जीएसएलव्ही मार्क ३ या रॉकेटच्या माध्यमातून इस्त्रोला अंतराळामध्ये ४ हजार किलोचे उपग्रह सोडणे शक्य होणार आहे. 

 मार्क ३ च्या माध्यमातून अवकाश कुपीही  (स्पेस कॅप्सूल) अंतराळात सोडणे शक्य झाल्याने अंतराळात मानवाला पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेतील पहिला टप्पाही इस्त्रोने पूर्ण केला. अवकाश कुपीमध्ये दोन जणांना अंतराळात पाठवता येईल.

> २०१६ मधील चंद्रयान - २ आणि मंगलायन  - २ चे प्रक्षेपणही मार्क - ३ च्या मदतीने करणे शक्य होणार आहे.