शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

फ्लायर

By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST

सरकारच्या प्रीतिभोजनाकडे सहा मंत्र्यांची पाठराजनाथसिंह यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी घेतली नोंदसदगुरू पाटील-पणजी : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि अन्य केंद्रीय नेत्यांच्या स्वागतासाठी राज्य सरकारतर्फे रविवारी रात्री आयोजिलेल्या प्रीतिभोजनाकडे सहा मंत्र्यांनी पाठ फिरवली. दोनापावल येथे सिदाद- दी- गोवा या पंचतारांकित हॉटेलमध्ये सरकारतर्फे या प्रीतिभोजन आयोजिले होते. त्यास सभापती राजेंद्र आर्लेकर आणि सहा मंत्री ...




सरकारच्या प्रीतिभोजनाकडे सहा मंत्र्यांची पाठ

राजनाथसिंह यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी घेतली नोंद

सदगुरू पाटील-पणजी : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि अन्य केंद्रीय नेत्यांच्या स्वागतासाठी राज्य सरकारतर्फे रविवारी रात्री आयोजिलेल्या प्रीतिभोजनाकडे सहा मंत्र्यांनी पाठ फिरवली. दोनापावल येथे सिदाद- दी- गोवा या पंचतारांकित हॉटेलमध्ये सरकारतर्फे या प्रीतिभोजन आयोजिले होते. त्यास सभापती राजेंद्र आर्लेकर आणि सहा मंत्री आले नाहीत, ही गोष्ट राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नजरेतून सुटली नाही.
गोव्यात आज, सोमवारी देशाच्या सागरी किनारप˜ीच्या सुरक्षेवर विचारविनिमयासाठी गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक आहे. त्यासाठी समितीचे प्रमुख असलेले राजनाथ सिंह रविवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह केंद्रीय नेते, अनेक खासदार या समितीचे सदस्य आहेत. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असणारे राजनाथ सिंह गोव्यात प्रथमच आले आहेत. या सर्वांसाठी लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुख्यमंत्री या नात्याने सरकारतर्फे प्रीतीभोजन आयोजिले होते. त्याचे निमंत्रण फक्त मंत्र्यांना, खासदारांना आणि भाजपच्या गोव्यातील मोजक्याच पदाधिकार्‍यांना होते.
प्रीतीभोजनास सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्यासह सहा मंत्री वारंवार बोलावूनही पोहोचू शकले नाहीत. सहा मंत्री का आले नाहीत, याची कारणे वेगवेगळी असल्याची चर्चा हॉटेलात लगेचच सुरू झाली होती. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा प्रीतीभोजनास अर्धा तास उशिरा पोहोचले. वनमंत्री एलिना साल्ढाना यांना दूरध्वनीवरून बोलावल्यानंतर त्या दहा मिनिटांसाठी आल्या. उपसभापती अनंत शेट खूप उशिरा पोहोचले. केंद्रीय गृह राज्य मंत्री किरण रिजीजू, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि खासदार शांताराम नाईक उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खजिनदार संजीव देसाई, मंत्री सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर, खासदार नरेंद्र सावईकर यांनी प्रीतीभोजनात भाग घेतला.
पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर, माहिती मंत्री मिलिंद नाईक, उद्योग मंत्री महादेव नाईक, क्रीडा मंत्री रमेश तवडकर, मजूर मंत्री आवेर्तान फुर्तादो, जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी या प्रीतीभोजनाकडे पाठ फिरविली. त्यांनी येऊन जावे म्हणून हॉटेलमधून दूरध्वनी करण्यात आले; पण ते पोहचू शकले नाहीत. या प्रीतीभोजनाचे निमंत्रण भाजपच्या सर्व मंत्र्यांना दोन-तीन दिवस अगोदर दिले होते, ऐनवेळी त्यांना बोलावले असे झालेले नव्हते. त्यांच्या न येण्याची चर्चा होत राहिली.