शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलमध्ये पूरस्थिती गंभीर

By admin | Updated: August 23, 2015 03:35 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अरुणाचल प्रदेशच्या नामसाई आणि लोहित जिल्ह्यात गंभीर

इटानगर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अरुणाचल प्रदेशच्या नामसाई आणि लोहित जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अधिकृत माहितीनुसार नोआ दिहिंग आणि तिच्या उपनद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नामसाई जिल्ह्यातील खालच्या भागात प्रामुख्याने लेकांग क्षेत्रात न्यू सिलाटू, धरमपूर, लेकांग गोहन गाव, दिरक गिरी, रंजलीबील, राजाबील आणि फिलोबारीमध्ये पूर आला आहे. पुरामुळे नामसाई आणि तेजूदरम्यान संपर्क तुटला आहे. लोहित, कमलँग, बेरेंग, तेंगापानी आणि जेंगथूसह सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. चांगलिआंग, धिवाजीनगर, खोरलिआंग, दुरालिआंग, दांगलत, सनपुरा आदी गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. चांगलिआंग या गावात तर मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. बलिजान भागातील एक लघु प्रकल्प फुटल्यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशसह हरियाणा, पंजाब राज्यात आज हलक्या ते मध्यम सरी कोसळल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)