शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडीलचा जीएसटी कर प्रणालीला विरोध

By admin | Updated: February 9, 2017 21:46 IST

देशातल्या नावाजलेल्या ई-कॉमर्समधल्या ऑनलाइन रिटेल कंपन्या फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अ‍ॅमेझॉननं जीएसटी कायद्याला विरोध दर्शवला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - देशातल्या नावाजलेल्या ई-कॉमर्समधल्या ऑनलाइन रिटेल कंपन्या फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अ‍ॅमेझॉननं जीएसटी कायद्याला विरोध दर्शवला आहे. जीएसटी मसुद्यातील कर प्रणाली(टीसीएस)च्या नियमांबाबत या कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे. टीसीएस (टॅक्स कलेक्टड अ‍ॅट सोर्स)अंतर्गत बाजारातून विक्रेत्याला मिळणारा फायदा आता सरकारकडे जमा करावा लागणार आहे. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार टॅक्स कलेक्टड अ‍ॅट सोर्स या कर प्रणालीमुळे वर्षाला जवळपास 400 कोटी रुपयांचं भांडवल अडकून राहणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडून ऑनलाइन विक्रीला अल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या मसुद्याला या महिन्याच्या शेवटी अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. 

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांच्या मते, आम्ही पूर्ण यंत्रणेत व्यापकता आणली आहे. हजारो आणि कोटींमध्ये आमचे ऑनलाइन विक्रेते आहेत. त्यातील काही जण उद्योजकही आहेत. तसेच काही ऑफलाइन रिटेलरही आहेत. जीएसटी कर प्रणाली लागू केल्यास आमचे क्षेत्र प्रभावित होऊन विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागेल. टीसीएसमुळे जवळपास 400 कोटी रुपयांचे भांडवल अडकणार असून, ते विक्रेत्याला मिळणार नाही. त्यामुळे खेळते भांडवल कमी होईल आणि विक्रेता ऑनलाइन व्यवसाय करण्यापासून टाळाटाळ करेल.