शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

भारतातून गेलेले विमान दुबईत उतरताना आदळले

By admin | Updated: August 4, 2016 04:03 IST

भारतातून थिरुवनंतपूरम येथून आलेले एमिरेटस एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान बुधवारी दुपारी दुबई विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवर जोरदार आदळले.

दुबई : भारतातून थिरुवनंतपूरम येथून आलेले एमिरेटस एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान बुधवारी दुपारी दुबई विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवर जोरदार आदळले. या अपघातानंतर विमानास आग लागली. त्यातून धुराचे प्रचंड लोट येऊ लागले. मात्र २२६ भारतीयांसह २८२ प्रवाशांना आणि १८ चालक कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने संभाव्य मोठी जीवितहानी टळली.या अपघाताने मुख्य धावपट्टी अडून राहिल्याने आणि मदत व बचाव कार्यासाठीही सभोवतालचा परिसर मोकळा करावा लागल्याने दुबई विमानतळावरून होणारी विमानांची सर्व उड्डाणे संध्याकाळपर्यंत स्थगित ठेवण्यात आली. दुबई हा आखतातील सर्वात गर्दीचा विमानतळ असून एमिरेट्स ही तेथे मुख्यालय असलेली सर्वात मोठी विमान कंपनी आहे.एमिरेट््स एअरलाइन्सने त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती देताना सांगितले की, बोर्इंग ७७७ जातीच्या या विमानाने (फ्लाईट इके५२१) बुधवारी सकाळी १०.१९ वाजता थिरुवनंतपूरम येथून उड्डाण केले व दुपारी १२.५० वाजता ते दुबई विमानतळावर उतरणे अपेक्षित होते.विमान सुखरूपपणे न उतरता ते धावपट्टीवर जोरात का व कसे आदळले, याचा कोणताही खुलासा विमान कंपनीने केला नाही. मात्र काही तासांच्या प्रयत्नांनंतर विमानातून सर्व प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. केरळमधील हजारो लोक आखातात नोकऱ्या करतात व त्यांच्या सोईसाठी अनेक विमान कंपन्यांनी थिरुवनंतपूरहून दुबई व आखातातील अन्य ठिकाणी थेट सेवा सुरु केलेल्या आहेत. ही विमाने जाताना व येताना नेहमीच पूर्ण भरलेली असतात. (वृत्तसंस्था)>अपघात का झाला ? : सविस्तर चौकशी होईपर्यंत या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार नसले तरी हे विमान जमिनीवर आदळले तेव्हा स्फोट झाल्याचे काहींनी सांगितले. या आदळलेल्या विमानाची म्हणून जी छायाचित्रे व ते आदळत असतानाचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आला, त्यात कलंडलेल्या विमानातून काळ््या धुराचे लोट आकाशात झेपावत असताना दिस होते.>गुवाहाटी विमानतळावर विमानांची टक्कर टळलीइंडिगो कंपनीच्या दोन विमानांची मंगळवारी संध्याकाळी गुवाहाटी विमानतळावर होऊ शकणारी टक्कर सुदैवाने थोडक्यात टळली. मात्र या घटनेमुळे चार प्रवाशांना भोवळ आली तर दोन विमान कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली.इंडिगो कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुंबईहून आलेले विमान गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपीनाथ बारदोलाई विमानतळावर उतरण्याच्या तारीत असताना पावसाळी हवामानामुळे त्याला हादरे बसू लागले. परिणामी हे विमान ठरलेल्या उंचीपेक्षा अचानक २५० ते ३०० फूट खाली आणावे लागले. नेमके त्याच वेळी चेन्नईला निघालेल्या विमानाने उड्डाण केलेले होते. मुंबईहून आलेले विमान लगेचच झटकन अधिक उंचीवर नेले गेले अन्यथा त्याच मार्गातून उड्डाण करणाऱ्या दुसऱ्या विमानाशी त्याची टक्कर होऊ सकली असती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना न होता मुंबईहून आलेले विमान सुखरूपपणे उतरले व चेन्नईला निघालेले विमान विनाविघ्न रवाना झाले, असेही प्रवक्त्याने सांगितले.