विमानतळाजवळ धूर दिसल्याने विमानांच्या उड्डाणास विलंब
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
चेन्नई : चेन्नई विमानतळाजवळ धूर निघत असल्याचे दिसून आल्यानंतर पाच विमानांचे उड्डाण आणि आगमन रोखण्यात आले. हा धूर विमानतळाच्या धावपीपर्यंत आल्यानंतर तेथे दृश्यता कमी झाल्यामुळे विमानांच्या उड्डाण व आगमनास ३० मिनिटांचा विलंब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
विमानतळाजवळ धूर दिसल्याने विमानांच्या उड्डाणास विलंब
चेन्नई : चेन्नई विमानतळाजवळ धूर निघत असल्याचे दिसून आल्यानंतर पाच विमानांचे उड्डाण आणि आगमन रोखण्यात आले. हा धूर विमानतळाच्या धावपट्टीपर्यंत आल्यानंतर तेथे दृश्यता कमी झाल्यामुळे विमानांच्या उड्डाण व आगमनास ३० मिनिटांचा विलंब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.तिरुचिरापल्लीहून येणारे खासगी विमान सकाळी १०.३० वाजता विमानतळावर उतरणार होते. परंतु दृश्यता कमी असल्याकारणाने हे विमान अन्यत्र वळविण्यात आले. त्यानंतर आणखी पाच विमानांचे उड्डाण व आगमन थांबविण्यात आले. ३० मिनिटांपर्यंत वाहतूक खोळंबल्यानंतर दृश्यता वाढी आणि विमानांचे आवागमन पूर्ववत सुरू झाले. विमानतळाच्या बाहेरून हा धूर विमानतळावर आल्याचे या सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)