शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मोबाईलच्या फ्लॅश लाइटमध्ये जन्मला 'वंशाचा दिवा'

By admin | Updated: October 6, 2016 23:55 IST

थ्री इडिएट्स चित्रपटातला प्रसिद्ध किस्सा गुरगावमध्ये एका सरकारी रुग्णालयात घडल्याचा प्रकार उजेडात आला

ऑनलाइन लोकमतगुडगाव, दि. 6 - थ्री इडिएट्स चित्रपटातला प्रसिद्ध किस्सा गुडगावमध्ये एका सरकारी रुग्णालयात घडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. रुग्णालयाची बत्ती गुल झाल्यानं एका महिलेची मोबाईलच्या फ्लॅश लाइटमध्ये डिलिव्हरी करायची वेळी नर्सवर आली. अगोदर तीन मुली असलेल्या या कुटुंबाला आता मोबाईलच्या फ्लॅश लाइटमध्ये वंशाचा दिवा मिळाला आहे. मिलेनियम सिटीमधल्या सरकारी रुग्णालयात एका महिलेला संध्याकाळच्या सुमारास प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरही ड्युटीवर हजर नव्हते. नर्स आणि वॉर्डबॉयच फक्त रुग्णालयात होते. त्याच दरम्यान रुग्णालयातली बत्ती अचानक गुल झाली. रुग्णालयात पसरलेल्या काळोखात उजेड होता तो फक्त मेणबत्त्यांचा. अचानक त्याच वेळी महिलेला जोरजोरात प्रसूती वेदना होऊ लागल्या. मात्र डॉक्टर ड्युटीवर हजर नसल्यानं नर्स प्रसूती कक्षात दाखल झाल्या. मात्र फक्त मेणबत्त्यांच्या प्रकाशात महिलंचं बाळंतपण करणं अशक्य असल्याचं उपस्थित नर्सच्या वेळीच लक्षात आल्यानं त्यांनी चक्क मोबाईलच्या फ्लॅश लाइटमध्ये त्या महिलेचं बाळंतपण केलं. आणि त्या महिलेनं मुलाला जन्म दिला.

थ्री इडिएट्स चित्रपटातला कित्ता या रुग्णालयात पुन्हा गिरवला गेल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या घटनेची सर्व हकीकत त्या गर्भवती महिलेचा पती कपिल कुमार यांनी सांगितली आहे. मात्र या प्रकारामुळे सरकारी रुग्णालयांतील गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.