पूर्व किना-यावर हुदहुद वादळाने थैमान घातले आणि आंध्र प्रदेश व ओरिसाच्या किनारी भागाला चांगलाच फटका बसला.
हरयाणामध्ये ९० पैकी ४७ जागा जिंकत भाजपाला बहुमत मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले जगदीश खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
४० जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा देत शिवसेनेची गोची केली आणि या बळावर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
भाजपानं प्रथमच स्वबळावर महाराष्ट्रात निवडणुका लढवल्या आणि मोदी लाटेवर स्वार होत १२३ जागा जिंकल्या.
आघाडी टिकवण्यासाठी अजित पवारांवर कारवाई केली नाही तर आदर्शप्रकरणी कारवाई केली असती काँग्रेस दुभंगली असती अशी वादग्रस्त विधाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत केली.
कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई या दोघांना शांततेचे नोबेल पारितोषक जाहीर झाले आणि भारतात आनंदाला उधाण आलं.
दसरा आनंदाचा सण परंतु तो बिहारमध्ये दु:खाचा ठरला. पाटण्यातील गांधी मैदानात पाच लाख लोक जमले होते. विजेची जिवंत तार पडल्याची अफवा पसरली आणि चेंगराचेंगरीत ३२ जण मरण पावले तर ५० जण जखमी झाले.
भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला हरवत १७व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि ऑलिंपकमधला प्रवेशही निश्चित केला. यावेळी भारतीय संघाचा कप्तान सरदार सिंग.
भारतीय बॉक्सर मेरी कोमने इंचेऑनमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि अजून आपण पूर्ण भरात असल्याचे दाखवून दिले.
दहशतवादाचा बिमोड करण्यापासून ते व्यापार वाढवण्यापर्यंतच्या अनेक मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची चर्चा झाली आणि भारत व अमेरिकेचे संबंध आणखी सुधारल्याचे दिसून आले.