शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

Flash Back नोव्हेंबर २०१४

By admin | Updated: December 23, 2014 00:00 IST

ज्येष्ठ काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे वयाच्या ७७व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहणारे देवरांचे सगळ्या पक्षांच्या नेत्यांशी सौहार्दाचे संबंध होते.केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मनीच्या ऐवजी संस्कृत शिकवण्याच्या स्मृती इराणींच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल यांनीदेखील नाराजी व्यक्त केली.स्वयंघोषित धर्मगुरू रामपालला अखेर पोलीसांनी ...

ज्येष्ठ काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे वयाच्या ७७व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहणारे देवरांचे सगळ्या पक्षांच्या नेत्यांशी सौहार्दाचे संबंध होते.

केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मनीच्या ऐवजी संस्कृत शिकवण्याच्या स्मृती इराणींच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल यांनीदेखील नाराजी व्यक्त केली.

स्वयंघोषित धर्मगुरू रामपालला अखेर पोलीसांनी अटक केली खुनाच्या आरोपाच्या एका जुन्या खटल्याच्या सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे समन धुडकावणा-या व शेकडो हिंसक पाठिराख्यांचे पाठबळ असलेल्या रामपालला अटक करून कायदा सगळ्यांसाठी समान असल्याचे दिसून आले.

हायकोर्टाने मराठा व मुस्लीमांना आरक्षण देण्याच्या राज्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. केवळ मुस्लीमांना शिक्षणामध्ये आरक्षण देता येईल असे स्पष्ट केले

गुजरातने स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान सक्तीचे करणारा कायदा केला. अर्थात मतदान न करणा-यांना काय जेलमध्ये टाकणार का अशी टीका खुद्द निवडणूक आयुक्त ब्रह्मा यांनीच केली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे संरक्षण खाते सोपवण्यात आले. स्वच्छ चारित्र्याचे आणि निर्णयक्षम अशी प्रतिमा असलेल्या पर्रीकरांनी संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.

वाघा बॉर्डरच्या पाकिस्तानच्या भागात एका दहशतवाद्याने २५ किलो वजनाच्या बाँबचे स्फोट घडवले आणि ५५ जणांचा बळी घेतला तर २०० जण जखमी झाले. लष्कराचा फ्लॅग सेरेमनी बघून परतत असलेले नागरिक या हल्ल्याचे बळी ठरले.

सचिन तेंडुलकरच्या इट्स प्लेइंग माय वे या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाने प्रकाशनपूर्व विक्रीचा उच्चाक गाठताना एक कोटीचा पल्ला पार केला. अर्थात ग्रेग चॅपेलनी राहूल द्रविडला कप्तानपदावरून काढण्याचे व सचिनला कप्तान बनवण्याचा डाव आखल्याचा गौप्यस्फोट सचिननं केला याचीच खमंग चर्चा रंगली.

इस्लामिक स्टेटचा जिहादी बनत इराकमध्ये गेलेला अरीब मजिद हा कल्याणचा तरूण भारतात परतला. त्याला राष्ट्रीय तपास पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले.

एका स्थानिक सामन्यात अ‍ॅबॉटचा बाउन्सर डोक्यावर आदळल्याने फिल ह्युज या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाचा मृत्यू झाला आणि क्रीडाविश्वात खळबळ उडाली. अत्यंत धक्का बसलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचा भारताशी होणारा पहिला सामना पुढे ढकलण्यात आला.

विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलेल्या शिवसेनेचे अखेर भाजपाशी सुरू झालेल्या चर्चेचे गु-हाळ अखेर संपले आणि शिवसेना सत्तेत सहभागी झाली.