सार्क देशांच्या प्रमुखांना पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी बोलावून नरेंद्र मोदींनी आपले आंतरराष्ट्रीय राजकारण कसे असेल याची चुणूक दाखवली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफही मोदींचे आमंत्रण टाळू शकले नाहीत.
संसदेमध्ये प्रथम प्रवेश करताना नरेंद्र मोदींनी पाय-यांवर डोकं टेकलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
तीस वर्षांनी पहिल्यांदाच एकाच पक्षाला लोकसभेत संपूर्ण बहुमत मिळालं. त्याचं सगळं श्रेय होतं नरेंद्र मोदी. भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असेल परंतु त्यांना २४४ जागा मिळमार नाहीत असा अंदाज सगळ्या तज्ज्ञांनी व पाहण्यांनी व्यक्त केला. प्रत्यक्षात लोकांनी मोदींच्या पारड्यात २८२ जागा दिल्या आणि एनडीएला ३३६ जागी विजय केले. काँग्रेसला अवघ्या ४४ जागा मिळाल्या ज्या विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठीही अपु-या ठरल्या.
निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केला आणि निवडणूक आयोगाला आव्हान दिले.
इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी सीबीआयची गुजरातचे तत्कालिन गृहमंत्री अमित शाह यांना क्लीन चीट
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमध्ये ५६०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा व १८ हजार गुंतवणूकदारांना फटका बसल्याचा आरोप झाला. याप्रकरणी मुख्य प्रवर्तक जिग्नेश शाह व सीएफओ श्रीकांत जवळगेकर यांना आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली.
निवडणूक प्रचार शिगेला पोचला असताना मोदींनी गांधी घराण्यावर टीकेचा जहरी मारा केला. तर मोदी विरोधकांनी गुजरात दंगलींचा सदर्भ देत मोदी देशाचं धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप केला.
दिवा सावंतवाडी ही गाडी कोकण रेल्वेच्या मार्गावर रोह्याजवळ घसरली आणि मोठा अपघात झाला. या अपघातात १९ प्रवासी ठार झाले तर १२१ जण जखमी झाले.
आसाममध्ये स्थानिक बोडो व बांग्लादेशातून स्थलांतरीत झालेले मुस्लीम यांच्यातला संघर्ष शिगेला पोचला. तीन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये ३१ मुस्लीमांचा बळी गेला असून बांग्लादेशी स्थलांतरीतांचा प्रश्न तसेच बोडोंमधले दहशतवादी गटांच्या कारवाया यांचा प्रश्न ऐरणीवर आला. पाचशेपेक्षा जास्त मुस्लीम स्थलांतरीतांनी मदत छावणीचा आसरा घेतला.
राज्यसभा टिव्हीची अँकर ४३ वर्षीय अमृता रायशी अपले संबंध असल्याचे व लवकरच आम्ही लग्न करणार असल्याचे काँग्रेस नेते दिग्विजयसिंग यांनी मान्य केले. दोघांचे शारिरीक लगट करतानाचे फोटो सोशल मीडियावर फिरायला लागल्यानंतर अखेर दिग्विजय सिंगांनी या प्रकरणाची कबुली दिली.