शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

Flash Back जून २०१४

By admin | Updated: December 22, 2014 00:00 IST

जवळ आलेल्या विधानसभांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाबरोबरच मुस्लीमांनाही ४.५ टक्क्यांचे आरक्षण देण्याचा घाट घातला.शंभर दिवसात काळा पैसा परत आणू अशा वल्गना निवडणुकीच्या काळात केलेल्या भाजपाला स्वित्झर्लंडने भारत सरकारला दिलासा दिला. स्विस बँकांत खाती असलेल्या भारतीयांची यादी देण्याचे स्विस सरकारने कबूल केले.फूटबॉल वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या बलाढ्य ...

जवळ आलेल्या विधानसभांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाबरोबरच मुस्लीमांनाही ४.५ टक्क्यांचे आरक्षण देण्याचा घाट घातला.

शंभर दिवसात काळा पैसा परत आणू अशा वल्गना निवडणुकीच्या काळात केलेल्या भाजपाला स्वित्झर्लंडने भारत सरकारला दिलासा दिला. स्विस बँकांत खाती असलेल्या भारतीयांची यादी देण्याचे स्विस सरकारने कबूल केले.

फूटबॉल वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या बलाढ्य संघाला कोस्टारिकाने हरवले आणि इंग्लंडचा संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला.

केंद्र सरकारने कडू निर्णय घेण्यास सुरूवात केली. रेल्वे प्रवास १४ टक्क्यांनी महागला तर रेल्वेच्या मालवाहतुकीचे दर ६.५ टक्क्यांनी वाढवले.

केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर आधीच्या सरकारनं नियुक्त केलेल्या राज्यपालांना पद सोडण्यास सांगण्याचे प्रकार घडले. महाराष्ट्रातही आपल्याला राजीनामा देण्यास सांगण्यात येत असल्याचा आरोप के. शंकरनारायण यांनी केला. अखेर त्यांच्या जागी भाजपाने विद्यासागर राव यांची नियुक्ती केलीच.

नेस वाडियाने चारचौघात आपला विनयभंग केल्याची तक्रार त्याची एकेकाळची खास मैत्रीण असलेल्या प्रिती झिंटाने केला आणि क्रीडा तसेच चित्रपट उद्योगात चर्चेला निमित्त मिळाले.

अखेर आयपीएलच्या सातव्या मोसमात कोलकाता नाइटरायडर्सने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात कोलकाताने दिल्ली किंग्ज इलेवनचा तीन गडी राखून पराभव केला.

महाराष्ट्राला चांगलाच धक्का देणारी दुर्देवी घटना ३ जून २०१४ या दिवशी दिल्लीत घडली. कार अपघातात गोपीनाथ मुंडे यांचे दुर्दैवी निधन झाले. महाराष्ट्रात भाजपाला सत्तेत बघण्याचे स्वप्न मुंडेंनी बघितलं परंतु सत्ता मिळवलेली बघण्यासाठी ते राहिले नाहीत.

१ जून २०१४ या दिवशी तेलंगणा राज्याची निर्मीती झाली. अनेक दशकांच्या संघर्षानंतर तेलंगणा राष्ट्र समितीला यश आले आणि आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळे करण्यात आले. देशातले २९ वे राज्य झालेल्या तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून टीआरएसच्या के. चंद्रशेखर राव यांनी शपथ घेतली.