शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
4
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
5
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
6
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
7
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
8
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
9
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
10
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
11
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
12
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
13
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
14
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
15
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
16
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
17
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
18
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
19
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
20
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

Flash Back ऑगस्ट २०१४

By admin | Updated: December 22, 2014 00:00 IST

लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठांना संसदीय कार्यकारणीतून बाजुला करत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बदलाची चुणूक दाखवली. अगदीच अडगळीत टाकले असे वाटू नये म्हणून या दोघांचा मार्गदर्शक समितीमध्ये समावेश करण्यात आला.१९९३ नंतर दिलेल्या सगळ्या सगळ्या म्हणजे २१८ कोळसा खाणींचे परवाने सुप्रीम कोर्टाने रद्द केले. कोळसा खाणींचे पारदर्शीपणे ...

लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठांना संसदीय कार्यकारणीतून बाजुला करत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बदलाची चुणूक दाखवली. अगदीच अडगळीत टाकले असे वाटू नये म्हणून या दोघांचा मार्गदर्शक समितीमध्ये समावेश करण्यात आला.

१९९३ नंतर दिलेल्या सगळ्या सगळ्या म्हणजे २१८ कोळसा खाणींचे परवाने सुप्रीम कोर्टाने रद्द केले. कोळसा खाणींचे पारदर्शीपणे पुनर्वाटप करण्याला व ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाचा असलेल्या या प्रश्नाला यामुळे चालना मिळमार आहे. भारताचे माजी कोळसा सचिव पी. सी. परख यांनी तर या विषयावर पुस्तक लिहिले.

भारताच्या अन्नधान्याच्या अनुदानासंदर्भातल्या भूमिकेवर जागतिक व्यापार संघटनेचा दबाव सहन करणार नसल्याचे वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. भारताने या कार्यक्रमाची भारतातल्या गरीबांना अत्यंत गरज असल्याचे पटवून दिले.

इंग्लंडच्या दौ-यावर मैत्रीण अनुष्का शर्माला नेण्याची परवानगी देण्यावरून वादळ उठलं. त्यानंतर पत्नी अथवा मैत्रीण किती दिवस विदेश दौ-यावर सोबत राहू शकते याबाबत नियम बनवण्याचा विचार बीसीसीआयने व्यक्त केला.

फुटीरतावादी हुरियतच्या नेत्यांशी पाकिस्तानच्या राजदूतांनी बोलणी केल्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानशी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. बोलणी एकतर भारताशी करा नाहीतर फुटीरतावाद्यांशी असे सांगत भारताने पाकिस्तानविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली.

प्रथमच स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलेटप्रूफ काचा काढण्यास सांगितले. मुलींना टोकणारे पालक रात्री अपरात्री भटकणा-या मुलांना आवर का घालत नाहीत असा मुलभूत प्रश्न विचारतानाच मोदींनी स्वच्छ भारत व घराघरामध्ये टॉयलेटसारख्या तळागाळातल्या प्रश्नाला हात घातला.

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदीलाटेमध्ये वाहून गेलेले लालूप्रसाद यादव व नितीशकुमार या जुन्या शत्रूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी ज्यांच्यामधून विस्तव जात नव्हता असे लालू व नितीशकुमार एकत्र आले.

तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे नेतृत्व आपणच करणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कोण बॉस आहे याबाबत स्पष्ट सूचना मिळाली.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अनिल दवे यांनी मी जर हुकूमशहा असतो तर पहिल्या इयत्तेपासून भगवदगीता व महाभारत सक्तीचे केले असते असे वक्तव्य केले आणि काँग्रेस व कम्युनिस्ट पार्टीने टीकेची झोड उठवली.