||श्रीमद्भागवत सप्ताहाचे येवल्यात ध्वजारोहण
By admin | Updated: May 11, 2014 19:02 IST
येवला- येवल्यात १६ मे ते २३ मे पर्यंत चालणार्या संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे ध्वजारोहण प.पू. रामगिरीजी महाराज यांचे हस्ते संपन्न झाले.
||श्रीमद्भागवत सप्ताहाचे येवल्यात ध्वजारोहण
येवला- येवल्यात १६ मे ते २३ मे पर्यंत चालणार्या संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे ध्वजारोहण प.पू. रामगिरीजी महाराज यांचे हस्ते संपन्न झाले.येवला-नांदगाव रेल्वेेगेट जवळ १६ मे पासून ज्ञानयज्ञन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. शनिवारी ध्वजारोहण झाले. या ज्ञानयज्ञासाठी कापसे पैठणी उद्योग समुहाचे बाळासाहेब कापसे यांनी दहा एकराच्या मैदानात या ज्ञानयज्ञ सोहळ्याची तयारी केली आहे. शुक्रवार १६ मे रोजी दुपारी ४ वाजता महंत रामगिरीजी महाराज यांचेसह साधुसंतांची भव्य मिरवणूक येथील गंगादरवाजाजवळून निघणार आहे.बाहेरगांवहून मोठ्या प्रमाणावर भाविक श्रीमद्भागवत कथेचा लाभ घेण्यासाठी येवल्यात येणार असल्याने निवासासह, भोजनाची व्यवस्था, कापसे पैठणी उद्योग समुहाने केली आहे. ज्ञानयज्ञ सोहळ्याचे मोठ्या प्रमाणावर आयोजन येवल्यात प्रथमच होत आहे. (वार्ताहर)---रामकृष्ण पाटोळे सेवानिवृत्तदेवळा- दि देवळा मर्चंन्टस् को-ऑप बँकेचे वसुली अधिकारी रामकृष्ण पाटोळे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी सेवापूर्ती कार्यस्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे जनसंपर्क संचालक सुशील गुजराथी होते. तर प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष रामदास दराडे होते.या प्रसंगी अंदरसूल शाखेचे मॅनेजे सत्यनारायण त्रिपाठी, राकेश पटेल, गणेश उपासे व मुख्य अतिथी मदनलाल चंडालिया यांनी पाटोळे यांच्या कारकिर्दीविषयी भाषणे केली. संचालक मंडळाच्यावतीने विजय चंडालिया, डॉ. वाय.बी.खांगटे, धनंजय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)---