धोरणाच्या मसुद्यावर सूचना सुचविण्यासाठी मुदत वाढ
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
धोरणाच्या मसुद्यावर सूचना सुचविण्यासाठी मुदत वाढ
धोरणाच्या मसुद्यावर सूचना सुचविण्यासाठी मुदत वाढ
धोरणाच्या मसुद्यावर सूचना सुचविण्यासाठी मुदत वाढंतावडेंचा ग्रीन सिग्नलमुंबई : मराठी भाषा सल्लागार समितीने मराठी भाषाविषयक धोरणाच्या मसुद्यावर सूचना, तक्रारी मागविल्या आहेत. मात्र यासाठी देण्यात आलेली मुदत आता २५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली असून हा मसुदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या काळात करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्याचा पुढील २५ वर्षांसाठीचा मराठी भाषाविषयक धोरणाचा मसुदा मराठी भाषा सल्लागार समितीने नुकताच जाहीर केला. या मसुद्याबाबत हरकती आणि सूचनांसाठीही आवाहन करण्यात आले आहे. या मसुद्याकरिता मुदतवाढ मिळावी, याकरिता मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार या विनंतीला त्वरित प्रतिसाद देत तावडे यांनी हिरवा कंदिल दाखविला. या मुदतीवाढीमुळे मसुद्याबाबतच्या सूचना बारकाईने मराठी भाषा विभागापर्यंत पोहोचविण्याचे काम विविध स्तरांवर होणार आहे. याशिवाय, मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनेही खुल्या चर्चेतील तक्रारी शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने पुण्यात ग.रा.पालकर प्राथमिक शाळा, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाशेजारी, कर्वेनगर येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत खुल्या चर्चेचे आयोजन केले आहे. या चर्चेत जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभागी होण्याचे आवाहन मराठी अभ्यास केंद्राने केले आहे. (प्रतिनिधी)..................