शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

तडवीने चोरल्या सरकारी कार्यालयातीलच दुचाकी पाच दिवस कोठडी : यावल व रावेर तालुक्यातून पंधरा दुचाकी हस्तगत

By admin | Updated: June 30, 2016 22:28 IST

जळगाव: पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या सरफराज कलिंदर तडवी (वय ३५ रा.दौंड, पुणे ह.मु. कुसुंबा ता.रावेर) याने सरकारी कार्यालयातूनच दुचाकीची चोरी केली आहे. त्याने आतापर्यंत २६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असली तरी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, बुधवार व गुरुवार या दोन दिवसात त्याने पोलिसांना यावल व रावेर तालुक्यातून १५ दुचाकी काढून दिल्या आहेत.

जळगाव: पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या सरफराज कलिंदर तडवी (वय ३५ रा.दौंड, पुणे ह.मु. कुसुंबा ता.रावेर) याने सरकारी कार्यालयातूनच दुचाकीची चोरी केली आहे. त्याने आतापर्यंत २६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असली तरी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, बुधवार व गुरुवार या दोन दिवसात त्याने पोलिसांना यावल व रावेर तालुक्यातून १५ दुचाकी काढून दिल्या आहेत.
बुधवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुचाकी चोरताना तडवीला रंगेहाथ पकडण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, उपनिबंधक कार्यालयात, जिल्हा रुग्णालय व न्यायालय आवारातून या दुचाकी चोरल्या आहेत. जळगाव, धुळे व मध्यप्रदेशातील काही जिल्‘ात निम्मे किमतीत त्याने या दुचाकी विक्री केल्या आहेत.
एकाच कंपनीच्या चोरल्या दुचाकी
दुचाकी चोरीत तडवीचा हातखंडा होता. सरकारी कार्यालयात गेल्यानंतर तेथे येणार्‍या दुचाकीस्वारांवर नजर ठेवून असायचा. ती व्यक्ती कार्यालयात गेली की, त्या दुचाकीजवळ जाऊन जणू ती दुचाकी आपलीच आहे या आवेशात काही वेळ उभे रहायचे. नंतर दुचाकील हॅँडल लॉक आहे का ते तपासायचे. ज्या दुचाकीला लॉक आहे, तिचा विचार सोडून दुसरी दुचाकी शोधायची. विना लॉक दुचाकीला चाबी लावून थेट त्या कार्यालयातून बाहेर पडायचे, ही त्याची चोरीची पध्दत होती.
मारुळला आढळल्या सात दुचाकी
यावल तालुक्यातील मारुळ येथे तब्बल सात दुचाकी त्याने विक्री केल्या होत्या. दहा ते पंधरा हजारात या दुचाकी चोरल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने चोरलेल्या सर्व दुचाकी या हिरोहोंडा कंपनीच्या फॅशन आहेत. रावेर, फैजपूर व सावदा या भागातून अन्य दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या भागात आणखी दुचाकी असण्याची शक्यता आहे.
दुचाकी घेणार्‍यांना नाही केले आरोपी
चोरी करणे व चोरीची वस्तू घेणार्‍यांना आतापर्यंतच्या घटनांमध्ये दोघांना आरोपी करण्यात आले आहे. या गुन्‘ात मात्र दुचाकी विकत घेणार्‍या एकाही जणाला आतापर्यंत आरोपी करण्यात आलेले नाही. तडवीसोबत आणखी कोणी आहे का? याची माहिती काढली जात आहे. दरम्यान, सहायक निरीक्षक जयपाल हिरे यांनी तडवी याला न्यायालयात हजर केले असता ४ जुलै पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.