शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला पाच पोलीस जखमी: निरिक्षकांच्या डोळ्यास दुखापत

By admin | Updated: July 19, 2015 21:22 IST

अंबरनाथ : सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी परिमंडळ-४ च्या उपायुक्तांनी तयार केलेल्या पथकावर शनिवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पथकाचे प्रमुख असलेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश कुंभार गंभीर जखमी झाले असून इतर पाच पोलीस जखमी झाले आहेत.

अंबरनाथ : सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी परिमंडळ-४ च्या उपायुक्तांनी तयार केलेल्या पथकावर शनिवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पथकाचे प्रमुख असलेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश कुंभार गंभीर जखमी झाले असून इतर पाच पोलीस जखमी झाले आहेत.
विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरांत होणार्‍या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी परिमंडळ-४ चे उपायुक्त वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक स्थापन करण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आशू युसुफ सय्यद हा अट्टल सोनसाखळी चोर कल्याणच्या मोहने येथील लहुजीनगर झोपडप˜ीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने शनिवारी रात्री त्याला पकडण्यासाठी या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केले. यात आशूसह त्याच्या तौफिक सय्यद, शब्बीर सय्यद, असमी दारा सय्यद आधि आपे दारा या त्यांच्या साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, आशूव्यतिरिक्त उर्वरित चोरटे पोलिसांशी झटापट करून निसटले. यानंतर, त्यांचा शोध घेत असतानाच हे सर्व जण मोठ्या जमावासह पोलिसांवर चालून आले. त्यांनी तलवारी, लोखंडी रॉड, मोठे दगड यांच्या साहाय्याने पोलीस पथकावर हल्ला करून जबर मारहाण केली.
या घटनेत पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक कुंभार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अंबरनाथ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते सध्या अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
या घटनेनंतर कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात या सर्व हल्लेखोर सोनसाखळी चोरांविरोधात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप, यातील कुठल्याही हल्लेखोराला अटक केलेली नाही.
...........................