शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरचा झपाट्याने विकास करण्यासाठी पाच मंत्र्यांचा गट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 06:04 IST

मोठी आर्थिक मदत देण्याचा विचार : ५० हजार रोजगारांच्या निर्मितीचे लक्ष्य

हरिश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा वेगाने विकास होण्याकरिता, तसेच तिथे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी मोदी सरकारने केंद्रीय विधि व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच मंत्र्यांचा एक गट स्थापन केला आहे. जम्मू-काश्मीरला मोठी आर्थिक मदत जाहीर करण्याचा विचार सरकार करत आहे.

काश्मीरमध्ये नजीकच्या काळात ५० हजार रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य मोदी सरकारने राखले आहे. जम्मू-काश्मीरमधील १ कोटी ३० लाख नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या ८५ योजना अंमलात आणण्याचा निर्णय या आधीच घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर आता केंद्रीय योजनांचा लाभ तेथील नागरिकांना घेता येईल.

पंतप्रधान-किसान, आयुष्मान भारत आदी योजनांचा त्यात समावेश आहे. अन्य राज्ये, केंद्रशासित प्रदेशांप्रमाणे आजवर काश्मीरमधील पोलीस व अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळत नव्हत्या. आता त्यांनाही लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, घरभाडे भत्ता, आरोग्य विमा, शिक्षण भत्ता आदी फायदे मिळणार आहेत.रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पाच जणांच्या मंत्रिगटामध्ये थावरचंद गेहलोत, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह, नरेंद्र तोमर, धर्मेंद्र प्रधान यांचाही समावेश आहे. काश्मीरचा जलद विकास कोणत्या पद्धतीने करायचा, तसेच रोजगाराच्या संधी कशा निर्माण करायच्या, यासंबंधीचा कृती आराखडा हा मंत्रिगट बनविणार आहे. जम्मू-काश्मीरचा वेगाने विकास होण्यासाठी प्रत्येक केंद्रीय खाते नेमके काय योगदान देऊ शकते, याचा प्रस्ताव तयार करण्यास या मंत्रिगटाला सांगण्यात आले आहे.

काश्मीरमध्ये शांतता कायम राहण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली आहे. मात्र, काश्मिरी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता तातडीने हालचाली करण्यास मोदी सरकारने प्राधान्य दिले आहे. अल्पसंख्याक खात्याच्या एक शिष्टमंडळ मंगळवारपासून काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौºयावर गेले आहे. काश्मीरच्या विकासासाठी नेमके कोणते प्रकल्प हाती घ्यायला हवेत, याची चाचपणी करून त्याचा अहवाल हे शिष्टमंडळ केंद्र सरकारला सादर करेल.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर