शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ची सुनावणी पाच न्यायाधीशांपुढे

By admin | Updated: July 13, 2017 00:17 IST

पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे येत्या १८ व १९ जुलै रोजी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ठरविले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘आधार’ कायद्याच्या वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिकांवर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे येत्या १८ व १९ जुलै रोजी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ठरविले.प्राप्तिकराचे रिटर्न भरण्यासाठी करदात्याने त्याचे पॅनकार्ड ‘आधार’ क्रमांकाशी संलग्न करून घेणे १ जुलैपासून सक्तीचे केले गेले. यास आव्हान देणाऱ्या याचिकेवर तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे उन्हाळी सुट्टीत सुनावणी झाली होती. त्या खंडपीठाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार देताना ‘आधार’मुळे नागरिकाच्या खासगी बाबींमध्ये हस्तक्षेप होतो का, हा मुद्दा मोठ्या पीठाकडे सोपविण्याची विनंती सरन्यायाधीशांना केली होती.अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ व याचिकार्त्यांचे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी बुधवारी सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहार व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे या याचिकेचा विशेष उल्लेख केला आणि लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यावर सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचे घटनापीठ असावे की सात न्यायाधीशांचे यावर थोडा वेळ चर्चा झाली. त्यानंतर तूर्तास पाच न्यायाधीशांचे घटनापीठ नेमावे व सुनावणीसाठी १८ व १९ जुलै असे दोन दिवस मुक्रर करावेत, असे ठरले. याखेरीज ‘आधार’ कायद्याच्या वैधतेस आव्हान देणाऱ्या इतर प्रलंबित याचिकाही या घटनापीठाकडे पाठविल्या जातील.‘आधार’ हे ऐच्छिक असेल, असे ‘आधार’ कायदा सांगतो. असे असूनही सरकार विविध योजनांचे लाभ देण्यासाठी ‘आधार’ची सक्ती करू शकते का, हा मुद्दाही सुनावणीसाठी असेल. त्यामुळे ‘आधार’ची सक्ती आणि ‘आधार’मुळे खासगी बाबींमध्ये होणारा कथित हस्तक्षेप, अशा दोन प्रमुख मुद्द्यांवर सुनावणी अपेक्षित आहे.>९ न्यायाधीशांचे पीठ?कदाचित या दोन मद्द्यांपैकी ‘प्रायव्हसी’चा मुद्दा नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडेही पाठवावा लागू शकेल. हा मुद्दा अनिर्णित नाही व ‘प्रायव्हसी’हा नागरिकाचा मुलभूत हक्क नाही, असा निकाल यापूर्वी आठ न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाळ यांनी ही बाब सरन्यायाधीशांच्या निदर्शनास आणली. त्यावर ते म्हणाले की, आधी सर्व याचिका पाच न्यायाधीशांच्या पीठापुढे जाऊ द्यात. मग ते प्रत्येक याचिकेचा विचार करतील व हा मुद्दा नऊ न्यायाधीशांकडे पाठवायचा की नाही ते ठरवतील.