शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाच सरकारी विमा कंपन्यांचे २५ टक्के भांडवल विकणार

By admin | Updated: January 19, 2017 04:45 IST

कंपन्यांमधील सरकारचे २५ टक्के भागभांडवल लोकांना विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : सर्वसाधारण विमा क्षेत्रातील पाच सरकारी कंपन्यांचे भांडवली बाजारांमध्ये ‘लिस्टिंग’ करण्यास आणि या कंपन्यांमधील सरकारचे २५ टक्के भागभांडवल लोकांना विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, युनायटेड इंडिया इन्श्युरन्स, ओरिएंटल इन्श्युरन्स, नॅशनल इन्श्युरन्स आणि भारतीय सर्वसाधरण विमा महामंडळ या पाच विमा कंपन्यांचे शंभर टक्के भागभांडवल सध्या सरकारकडे आहे. आता या भांगभांडवलातील सरकारचा हिस्सा २५ टक्क्यांनी कमी करून तो ७५ टक्क्यांवर आणण्यात येईल. तसेच या कंपन्यांचे भांडवली बाजारांमध्ये ‘लिस्टिंग’ही करण्यात येईल.सरकारी सार्वजनिक विमा कंपन्यांचा कारभार अधिक पारदर्शी व उत्तरदायी व्हावा यासाठी त्यांच्या भागभांडवलात जनतेला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या अर्थ संकल्पात केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने बुधवारी त्यास तत्वत: मंजुरी दिली. सदर प्रस्तावानुसार या पाच कंपन्यांच्या ‘लिस्टिंग’ची प्रक्रिया त्वरित सुरू होणार आहे. ‘सेबी’ आणि ‘इरडा’ यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या कंपन्यांमधील २५ टक्के सरकारी भागभांडवल ‘आॅफर फॉर सेल’ या पद्धतीने टप्प्याटप्प्याने विकले जाईल.भांडवली बाजारात केंद्राच्या पब्लिक सेक्टर एन्टरप्राईज (सीपीएसई) व एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) ला आजवर मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सरकारी कंपन्यांमधे गुंतवणुकीबाबत खाजगी गुंतवणूकदारांचा उत्साह लक्षणीय आहे.मंत्रिमंडळाच्या ताज्या निर्णयामुळे सरकारी इन्शुरन्स कंपन्या, गुंतवणूकदार व सरकार अशा तिन्ही पक्षांचा त्यामुळे फायदा होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)>इलेक्ट्रॉनिक उद्योगास प्रोत्साहनइलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उत्पादनवाढीला चालना देण्यासाठी या क्षेत्रातल्या उद्योगांना10000 कोटी रूपयांचे उत्तेजन अनुदान (इन्सेन्टिव्ह) देण्याचा निर्णयही या बैठकीत झाल्याने इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. या इन्सन्टिव्ह योजनेची मुदत येत्या १८ मार्च पर्यंत आहे.>‘लिस्टिंग’चे अपेक्षित फायदेवाढीव निधी व भांडवल यासाठी सरकारवर अवलंबून न राहता त्याची उभारणी भांडवली बाजारातून करता येईल.‘लिस्टिंग’ची सकंतीची पूर्वअट म्हणून या कंपन्यांचे व्यवस्थापन सुधारेल व त्यांची लेखापुस्तके लिहिण्याची पद्धत अधिक पारदर्शी होईल.जाब विचारायला खासगी भागधारकही आल्याने व्यवस्थापन अधिक उत्तरदायी होईल.