शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अर्थमंत्रालयाच्या पाच कर्मचाऱ्यांना कारावास

By admin | Updated: June 23, 2014 04:49 IST

सुमारे ४़२० लाख रुपयांच्या रजा व प्रवास सवलत (एलटीसी) घोटाळ्याप्रकरणी येथील स्थानिक न्यायालयाने रविवारी अर्थ मंत्रालयाच्या पाच कर्मचाऱ्यांसह सहा जणांना प्रत्येकी चार वर्षे कारावासाची शिक्षा

नवी दिल्ली : सुमारे ४़२० लाख रुपयांच्या रजा व प्रवास सवलत (एलटीसी) घोटाळ्याप्रकरणी येथील स्थानिक न्यायालयाने रविवारी अर्थ मंत्रालयाच्या पाच कर्मचाऱ्यांसह सहा जणांना प्रत्येकी चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली़ फसवणूक करून एलटीसीची अग्रिम रक्कम काढणे आणि ती वितरित करण्याचा आरोप त्यांच्यावर होता़सीबीआयचे विशेष न्यायाधीश संजीव जैन यांनी तीन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह सहा व्यक्तींना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमाअंतर्गत फौजदारी कट, फसवणूक आणि कटकारस्थानात दोषी ठरविले आहे़ न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यांमध्ये अर्थमंत्रालयाचे लक्ष्मीचंद (६७), बालेसिंह कसाना (५५), भगवानसिंह (५५) तसेच रघुवेंद्र कुमार (६३) आणि जे एल चोपडा (७०) यांचा समावेश आहे़ यापैकी चंद, कुमार आणि चोपडा निवृत्त झाले आहेत़ न्यायालयाने अर्थ मंत्रालयातील तत्कालीन कर्मचारी एसक़े़डी़ दास नायक यांनाही शिक्षा सुनावली़ ते तूर्तास कृषी भवनस्थित ग्रामविकास मंत्रालयात कार्यरत आहेत़ न्यायालयाने चंद, कसाना, सिंह, कुमार व नायक यांना प्रत्येकी एक लाख तर चोपडांना ५० हजार रुपये दंडही ठोठावला़ अर्थमंत्रालयात शिपाई असलेल्या पुरुषोत्तम लाल याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली, तर अन्य दोन आरोपी रमेशचंद शुक्ला आणि दिवाकर दीक्षित यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला़ कुणीही भ्रष्टाचार दडवू शकत नाही आणि भ्रष्ट व्यक्ती कायद्यापासून वाचू शकत नाही, असा कठोर संदेश समाजात जावा. असे शिक्षा ठोठावताना न्यायालयाने म्हटले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)