शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श संसदपटूंचा देशात प्रथमच गौरव

By admin | Updated: July 15, 2017 05:39 IST

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे १९ जुलै रोजी दिल्लीच्या विज्ञान भवनात ‘लोकमत संसदीय पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे १९ जुलै रोजी दिल्लीच्या विज्ञान भवनात ‘लोकमत संसदीय पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी ४ अशा ८ आदर्श खासदारांना ‘लोकमत संसदीय पुरस्कारा’ने या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व एच. डी. देवेगौडा, अर्थमंत्री अरुण जेटली, नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी व माजी लोकसभाध्यक्ष शिवराज पाटील हे कार्यक्रमात प्रमुख अतिथी असतील.भारतीय संसदेतर्फे उत्कृष्ट संसदीय कामगिरीबद्दल ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ देण्याची प्रथा आहे. तथापि, प्रसार माध्यमाद्वारे दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी ४ संसद सदस्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग, ‘लोकमत’तर्फे साकार होत आहे. वर्ष २0१६ मध्ये लोकसभा व राज्यसभेच्या ज्या मान्यवर सदस्यांनी विशेष उल्लेखनीय अष्टपैलू कामगिरी बजाविली, अशांना, तसेच संसदेत प्रथमच पदार्पण करणाऱ्या २, महिला खासदारांपैकी २, आदर्श संसदपटू २ सदस्य यांच्या सन्मानाबरोबच, दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी १ मान्यवर ज्येष्ठ खासदारांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी विधिमंडळ पुरस्काराला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे त्यापासून प्रेरणा घेत लोकमतने संसद सदस्यांसाठी पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला.>या ज्युरींनी केली निवडपुरस्कारप्राप्त संसद सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी ‘लोकमत’ने देशातील मान्यवर नेते व पत्रकारांच्या ज्युरी मंडळावर सोपविली होती. तीन बैठकांमध्ये सुमारे ९ तासांच्या चर्चेनंतर या मंडळाने ८ संसद सदस्यांची निवड केली आहे. ज्युरी मंडळाचे अध्यक्षपद लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांनी भूषवले. ज्युरी मंडळात डॉ. मुरली मनोहर जोशी, मल्लिकार्जुन खडगे, सीताराम येचुरी, शरद यादव, इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा, इंडिया टुडेचे राजकीय संपादक राजदीप सरदेसाई, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व सदस्य सचिव पत्रकार हरीश गुप्ता यांचा समावेश होता.