शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

रामायणावरील परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 03:43 IST

देशात वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच कर्नाटकात नववीत शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुस्लिम विद्यार्थिनीने धार्मिक सहिष्णुतेचा नवा आदर्श घालून दिला आहे.

मंगळुरू : देशात वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच कर्नाटकात नववीत शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुस्लिम विद्यार्थिनीने धार्मिक सहिष्णुतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. मंगळुरू जिल्ह्याच्या पुत्तूर तालुक्यातील फातिमा राहिलाने रामायणावरील परीक्षेत ९३ टक्के गुण पटकावले आहेत.भारत संस्कृती प्रतिष्ठानतर्फे नोव्हेंबर २०१५ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. रामायण आणि महाभारतावर आधारित अभ्यासक्रम करण्याची फातिमाची मनापासून इच्छा होती. तिच्या काकांनी तिला साथ दिल्याने हे शक्य होऊ शकले, असे उद्गार फतिमाचे वडील इब्राहीम यांनी काढले. ते कारखान्यात काम करतात, तर आई गृहिणी आहे. रामायणावरील परीक्षेत मिळालेल्या यशानंतर फातिमाला आता महाभारताची परीक्षा द्यायची आहे. गेल्या वर्षी मुंबईतील मरियम आसीफ सिद्दीकी या १२ वर्षीय मुलीने भगवद्गीता स्पर्धेत अव्वल स्थान पटकाविले होते. (वृत्तसंस्था)विद्यार्थी स्वेच्छेने आणि स्वत:च संपूर्ण अभ्यास करून या परीक्षेला बसतात. परीक्षेसाठी कुणावरही दबाव आणला जात नाही, असे शाळेचे मुख्याध्यापक शिवराम एचडी आणि परीक्षेचे समन्वयक पी. सत्यशंकर भट यांनी सांगितले. ती शिकत असलेल्या शाळेतून यंदा ३९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. फतिमा तालुक्यातून पहिली आली.