शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: कोरोनाची पहिली लस कधी, केव्हा अन् कोणाला?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

By कुणाल गवाणकर | Updated: December 21, 2020 10:07 IST

Corona Vaccine: कोरोना लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित; संपूर्ण देशात प्रशिक्षणाचं काम वेगानं सुरू

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. मात्र तरीही पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे कोरोनाची लस नेमकी कधी उपलब्ध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील महिन्याच्या म्हणजेच जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात देशात कोरोनाची पहिली लस देण्यात येईल, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. लसीच्या दर्जाबद्दल सरकार कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. नागरिकांना उत्तम दर्जाची लस दिली जाईल. जानेवारीत पहिली लस देण्यात येईल, असं हर्षवर्धन म्हणाले. सध्याच्या घडीला ६ लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. देशभरात या चाचण्या सुरू आहेत, अशी माहिती याआधी आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.तज्ज्ञांशी सल्लामसलत करून कोरोना लस प्राधान्यानं कोणाला द्यायची, याबद्दलचा निर्णय घेण्यात आल्याचं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. 'देशात ३० कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात येईल. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैन्य दलांमधील कर्मचारी, स्वच्छता कामगार, पन्नाशी पार केलेले नागरिक आणि पन्नाशी पार न केलेले मात्र गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या नागरिकांचा समावेश असेल,' अशी माहिती त्यांनी दिली.कोरोना लसीकरणासाठी सरकारनं प्राधान्यक्रम निश्चित केलेला आहे. यातील प्रत्येकापर्यंत कोरोना लस पोहोचावी, त्यानं ती लस घ्यावी असा सरकारचा प्रयत्न असेल. मात्र एखाद्यानं लस टोचून न घेण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, असं हर्षवर्धन म्हणाले. 'लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण सुरू आहे. आतापर्यंत २६० जिल्ह्यांत २० हजार जणांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे,' अशी आकडेवारी त्यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या