शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये पहिले ‘एव्हिएशन पार्क’

By admin | Updated: February 9, 2016 03:51 IST

देशातील पहिले ‘एव्हिएशन पार्क’ गुजरातमध्ये साकारले जाणार आहे. राज्यातील हवाई उड्डयन क्षेत्र मजबूत करण्यासाठी गुजरात शासनाने हा निर्णय घेतला आहे. या पार्कमध्ये

अहमदाबाद : देशातील पहिले ‘एव्हिएशन पार्क’ गुजरातमध्ये साकारले जाणार आहे. राज्यातील हवाई उड्डयन क्षेत्र मजबूत करण्यासाठी गुजरात शासनाने हा निर्णय घेतला आहे. या पार्कमध्ये धावपट्टी, प्रशिक्षण केंद्र, हेलिपॅड, तसेच लघुनिर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात येतील.हवाई उड्डयन क्षेत्रातील क्षमतेबाबत विद्यार्थी, उद्योजक, धोरण निर्माते, तसेच व्यवसाय क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी या एकीकृत ‘पार्क’चे निर्माण करण्यात येत आहे, अशी माहिती ‘गुजसेल’च्या (गुजरात स्टेट एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लि.) अधिकाऱ्यांनी दिली. राज्य शासनाने या प्रकल्पाची जबाबदारी ‘गुजसेल’कडे दिली आहे. हे ‘पार्क’ तयार करण्यासाठी ‘गुजसेल’ने बागडोरा येथील ६० हेक्टर जमीन निर्धारित केली आहे. जगात अशा प्रकारचे केवळ ३ ते ४ ‘एव्हिएशन पार्क’ आहेत. एकाच छताखाली विविध उपक्रम‘एव्हिएशन पार्क’मुळे ‘एरोस्पेस’शी संबंधित प्रशिक्षण, संशोधन, निर्मिती आणि उत्पादन एकाच छताखाली होणे शक्य होणार आहे. सुरुवातीच्या काळात या ‘पार्क’च्या माध्यमातून हवाई क्षेत्राशी संबंधित विविध प्रक्रिया व घडामोडींबाबत माहिती देण्यात येईल. याशिवाय येथे तंत्रज्ञानाने सुसज्जित सभागृह राहणार आहे. ‘एअर शो’, तसेच संंबंधित इतर उपक्रम व साहसी खेळांसाठी येथे जागा राखीव ठेवण्यात येईल, अशी माहिती चौहान यांनी दिली. (वृत्तसंस्था)