सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा जवान व पाक रेंजर्सदरम्यान गोळीबार
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
जम्मू-जम्मू काश्मीर राज्यातील सांबा सेक्टरमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स व सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या दरम्यान गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली.
सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा जवान व पाक रेंजर्सदरम्यान गोळीबार
जम्मू-जम्मू काश्मीर राज्यातील सांबा सेक्टरमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स व सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या दरम्यान गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली.बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सांबा सेक्टरमध्ये रिगाल सीमा चौकीजवळ काही व्यक्तींच्या संदिग्ध हालचाली पाहून भारतीय जवानांनी गोळ्यांच्या काही फैरी झाडल्या. त्याचा आवाज ऐकून पाक सैनिकांनीही काही फैरी झाडल्या. रात्री ११ वाजेपर्यंत थांबून थांबून हा गोळीबार होत राहिला. यात कोणीही जखमी वा ठार झाले नाही.