शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, सहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 12:39 IST

जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील थाटरी गावात रात्री उशिरा मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे आलेल्या पूरामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 20 - जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील  थाटरी गावात रात्री उशिरा मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे आलेल्या पूरामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी बचाव पथकाला त्यांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नैसर्गिक आपत्तीत 11 जण जखमी झाले असून, अनेक घरे, दुकानांचे नुकसान झाले आहे. एका शाळेच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामध्ये काही घरे वाहून गेली तर, काही घरे कोसळली. 
 
बचावपथकाने ढिगा-याखालून सहाजणांसह एका 12 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले. बचाव पथक मुलाच्या आई-वडीलांचा शोध घेत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या ढगफुटीमुळे गावातून वाहणा-या नाल्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आणि घरांमध्ये पाणी घुसले. नेमके किती नुकसान झालेय ते लगेच स्पष्ट होणार नाही. आम्ही बचावमोहिमेमध्ये असून जे अडकले आहेत त्यांना वाचवण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती अधिका-याने दिली. जिल्हा प्रशासनासह पोलीस, लष्कर युद्धपातळीवर मदत मोहिम राबवत आहेत. 
 
आणखी वाचा 
जम्मू काश्मीर : चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी
जम्मू काश्मीर : 6 दिवसांत 80,000 यात्रेकरूंनी पूर्ण केली अमरनाथ यात्रा
 
पूरामुळे मोठमोठे दगड थाटरीच्या बाजारात वाहून आल्याने बाटोटे-दोडा-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गा वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दोडा जिल्हा जम्मूमध्ये येतो. यंदाच्या मान्सूनमध्ये इथे मुसळधार पाऊस सुरु आहे. या आठवडयाच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करावी लागली होती. हा महामार्गच जम्मू आणि काश्मीर खो-याला जोडतो. 
 
आसाम, मणिपूर आणि ओदिशामध्येही मुसळधार पावसामुळे पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. एप्रिल महिन्यात झेलम नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. त्यामुळे प्रशासनाला धोक्याचा इशारा जारी करावा लागला होता. तीनवर्षांपूर्वी 2014 मध्ये काश्मीरला पूराचा मोठा तडाखा बसला होता. लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते. त्यावेळी भारतीय सैन्याने बचाव मोहिम राबवून अनेकांचे प्राण वाचवले होते.