शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

मेणबत्ती खाली पडल्याने घराला आग लागली, सहा मुलांचा मृत्यू

By admin | Updated: April 29, 2016 11:21 IST

मेणबत्ती खाली पडून संपूर्ण घराने पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील सहा मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची दु:खद घटना शुक्रवारी सकाळी घडली.

 ऑनलाइन लोकमत 

बरेली, दि. २९ - मेणबत्ती खाली पडून संपूर्ण घराने पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील सहा मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची दु:खद घटना शुक्रवारी सकाळी घडली. उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यातील किला चावनी गावात ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये चार सख्ख्या बहिणी आणि दोन चुलत भावंडांचा समावेश आहे. 
 
ही घटना घडली त्यावेळी फक्त ही मुलेच घरात होती.  या मुलांचे आई-वडील लग्नासाठी दुस-या गावात गेले होते. रात्री झोपताना उजेडासाठी म्हणून पेटवलेली मेणबत्ती विझवायला ही मुले विसरली आणि तशीच झोपी गेली. मध्यरात्री ही मुले गाढ झोपेत असताना मेणबत्ती खाली पडली आणि  संपूर्ण घराने पेट घेतला. त्यात होरपळून या मुलांचा मृत्यू झाला. 
 
सकाळी गावातील लोकांना घरातून ज्वाळा आणि धूर येताना दिसला. गावक-यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा घराचे छत कोसळलेले होते. दुर्घटनास्थळी सहा मुले मृतावस्थेत सापडली. किला पोलिस स्थानकाच्या हद्दीत काली धाम मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. शवविच्छेदनासाठी या मुलांचे मृतदेह पाठवण्यात आले आहे.