पान ४ वर गोठ्यास आग : २७ मुक्या जिवांचा जळून कोळसा अकोला+वाशिमला घ्यावी...
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
धाड (बुलडाणा): शेतातील गोठ्यास रात्रीच्या वेळी आग लागून २७ मुक्या जिवांचा करूण अंत, तर ३ जनावरे गंभीररित्या भाजल्याची घटना गुरूवारी बुलडाणा तालुक्यातील धाड येथे घडली.
पान ४ वर गोठ्यास आग : २७ मुक्या जिवांचा जळून कोळसा अकोला+वाशिमला घ्यावी...
धाड (बुलडाणा): शेतातील गोठ्यास रात्रीच्या वेळी आग लागून २७ मुक्या जिवांचा करूण अंत, तर ३ जनावरे गंभीररित्या भाजल्याची घटना गुरूवारी बुलडाणा तालुक्यातील धाड येथे घडली. धाड येथील शेतकरी गुलाबराव संपत गुजर यांनी शेतीमध्ये बांधलेल्या गोठ्यास २९ जानेवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच गुजर यांच्यासह काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन, आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. गंभीररित्या भाजलेली एक गाय, गोर्हा व एका बोकडास ग्रामस्थांनी बाहेर काढले. या आगीमध्ये गुजर यांची १ म्हैस, २० मोठ्या बकर्या आणि बकर्यांची ६ पिल्लं जागेवरच जळून कोळसा झाली. या व्यतिरिक्त ५० टीनपत्रे, २ स्प्रिंकलर संच, जनावराचा चारा, २ मोटारपंप, अवजारे, ढेप, रासायनिक खतांचे पोते, ठिबक संच, गहु, सोयाबीन, मका आदी कृषी साहित्य आणि जनावरे मिळून ५ लाख ५२ हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान, तहसीलदार दीपक बाजड आणि पशु वैद्यकीय अधिकारी पाचारणे यांच्यासह अधिकार्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी घटनास्थळाचा पंचनामा करून, जनावरांची उत्तरीय तपासणी केली.