शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

९३ दिवस गैरहजर कर्मचार्‍याची पाठराखण अग्निशमन अधिकार्‍यांचा प्रताप : उपायुक्तांनी दिली शिस्तभंगाची नोटीस

By admin | Updated: May 26, 2016 22:53 IST

जळगाव : दोन वर्षांच्या कालावधित अग्नीशमन विभागातील दोन कर्मचारी परवानगी न घेता व अर्ज न देताच अनुक्रमे ९३ व ४१ दिवस गैरहजर राहिले. नंतर रजिस्टरमध्ये खाडाखोड करून हजेरी लावून घेतली. तरीही याप्रकाराबद्दल वरिष्ठांना अहवाल न पाठविणार्‍या अग्निशमन अधिकारी वसंत कोळी यांना उपायुक्तांनी शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.

जळगाव : दोन वर्षांच्या कालावधित अग्नीशमन विभागातील दोन कर्मचारी परवानगी न घेता व अर्ज न देताच अनुक्रमे ९३ व ४१ दिवस गैरहजर राहिले. नंतर रजिस्टरमध्ये खाडाखोड करून हजेरी लावून घेतली. तरीही याप्रकाराबद्दल वरिष्ठांना अहवाल न पाठविणार्‍या अग्निशमन अधिकारी वसंत कोळी यांना उपायुक्तांनी शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.
कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर राहून नंतर खाडाखोड करून हजेरी लावत असल्याचे प्रकार दोन वर्षांपासून सुरू असतानाही अग्नीशमन अधिकारी वसंत कोळी यांनी त्याबाबत वरिष्ठांना कोणताही अहवाल पाठविला नाही. तसेच हा प्रकार उघडकीस आल्यावर उपायुक्तांनी दोघा कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना संबंधित कर्मचार्‍यांची अन्य विभागात बदली करण्याची शिफारस अग्नीशमन अधिकार्‍यांनी केल्याने व कारवाईच्या आदेशाचा अहवाल आस्थापना विभागाकडे हेतूपूर्वक उशिरा सादर केल्याने उपायुक्तांनी कोळी यांनाच शिस्तभंगाची नोटीस देऊन तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
------
ब्लेडने खाडाखोड
अग्नीशमन विभागातील सुरेश नामदेव सोनवणे हे जुलै २०१४ पासून मार्च २०१६ या कालावधित एकूण ९३ दिवस तर रवींद्र साहेबराव पाटील हे जून २०१४ पासून मार्च २०१६ पर्यंत एकूण ४१ दिवस कोणतीही पूर्व परवानगी न घेता अथवा रजेचा अर्ज न देता विनापरवानगी अधूनमधून गैरहजर असतात. तसेच गैरहजर राहिल्यावरही हजेरी मस्टरवर ब्लेडने खाडाखोड करून स‘ा करीत असल्याचे आढळून आले आहे. तर अग्नीशमन अधिकार्‍यांनी त्यांना सोयीस्करपणे पाठीशी घातले.