शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक दलाची दुरावस्था: एमआयडीसी केंद्रावरील बंब धक्का स्टार्ट; लोकसंख्या पाच लाख फायरफायटर चार आग लागली..पळा..पळा.. अन् पाणी शोधा

By admin | Updated: March 15, 2016 00:32 IST

जळगाव : आग लागली की पाण्यासाठी धावपळ करा अशी शहरातील अग्निशामक दलाची स्थिती असून चार पैकी केवळ एका केंद्रावर बंबात पाणी भरण्याची सुविधा असून एवढ्या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते.

जळगाव : आग लागली की पाण्यासाठी धावपळ करा अशी शहरातील अग्निशामक दलाची स्थिती असून चार पैकी केवळ एका केंद्रावर बंबात पाणी भरण्याची सुविधा असून एवढ्या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते.
शहराची लोकसंख्या जवळपास पाच लाख आहे. शहरालगत १२०० लहान मोठे उद्योग असलेली औद्योगिक वसाहत आहे. तेथे हजारो कामगार काम करत असतात. मोठा व्याप शहर परिसरात असताना अग्निशमन यंत्रणेबाबत उदासिनताच दिसून येत आहे.
असा आहे नियम
शहरातील लोकसंख्यनुसार अग्निशामक दलाची निर्मिती असणे गरजेचे आहे. ५० हजार लोकसंख्येमागे एक फायर फायटर असावा असा शासकीय नियम आहे. मात्र हा नियम जळगावसाठी लागू नसल्याचीच परिस्थिती दिसून येते. पाच लाख लोकसंख्येची मदार केवळ चार फायर फायटरवर असल्याचे लक्षात येते. तेदेखील काय सुस्थितीत आहेत अशी परिस्थिती नाही.
पाण्यासाठी वणवण
शहरात अग्निशामक दलाचे मुख्यालय गोलाणी मार्केटमध्ये आहे. तेथील परिस्थिती फार समाधानकार आहे असे नाही. दुसरे शिवाजीनगरमध्ये, तिसरे एमआयडीसी व चौथे महाबळ रोडला काव्यरत्नावली चौकात आहे. पैकी केवळ शिवाजी नगर अग्निशामक दलाच्या केंद्रावर पाणी भरण्याची व्यवस्था आहे. अन्य तीन ठिकाणी अशी व्यवस्था नाही आणि जेथे होती तीदेखील बंद झाली आहे. गोलाणी केंद्र, एमआयडीसी, महाबळ येथे पाणी भरण्याची व्यवस्था नाही. पाणी भरण्याचे पंपही भक्कम नाहीत त्यामुळे बंब भरण्यास वेळ लागतो.
क्रॉसबारचा अडथळा
शिवाजीनगरच्या अग्निशामक केंद्रावर पाणी भरण्यास जायचे असल्यास पुलाच्या क्रॉसबारचा अडथळा झाला आहे. त्यामुळे गुजराल पेट्रोपंपाकडून म्हणजे जवळपास चार किलो मिटरचा फेरा मारून या केंद्रावर पाणी भरण्यास जावे लागत असते. पाणी भरण्याचे दुसरे केंद्र मेहरूणकडील शिवाजी उद्यानात आहे. तेथेही बंबात गतीने पाणी भरले जात नाही.
कर्मचारीही कमीच
नियमानुसार एका बंबावर सहा कर्मचारी असणे बंधनकारक आहे. अशी परिस्थिती मात्र एकाही केंद्रावर दिसत नाही. या विभागातील ७० कर्मचार्‍यांना पुरेसे प्रशिक्षण नाही. तसेच आगीची एखादी गंभीर घटना घडल्यास पुरेसे संरक्षणाचे कपडेही त्यांच्याकडे नाहीत. त्यासाठीचे प्रस्तावही प्रलंबित असल्याचे समजले.
-----