शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या शोधा मतदारयादीत आपले ‘स्थान’

By admin | Updated: February 9, 2017 15:57 IST

नाशिककर तरुणाने विकसित केले मराठी अ‍ॅप

नाशिक : राज्यातील कुठल्याही जिल्ह्याचे तुम्ही मतदार असले तरी सहज घरबसल्या तुमच्या अ‍ॅन्ड्रॉइड भ्रमणध्वनीवरून आपल्या जिल्ह्याच्या मतदारयादीमध्ये संपूर्ण कु टुंबाचे ‘स्थान’ जाणून घेता येणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या नाशिककर तरुणाने ‘वोटर लिस्ट इन मराठी’ नावाचे अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप्लिकेशन पूर्णपणे मोफत डाउनलोड करता येते.राज्यातील सध्या दहा महानगरपालिका निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. निवडणुका आल्या की मतदारयादीत आपले नाव शोधणे हे मतदारांपुढे मोठे आव्हान असते. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या विविध राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडे असलेल्या याद्या धुंडाळून नावे शोधत त्यांची चिठ्ठी (स्लीप) घेऊन यायची ही पारंपरिक पद्धत. मात्र आता हा खटाटोप करण्याची मतदारांना गरज नाही. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात नाशिकच्या कर्णनगर परिसरात राहणारा तरुण कौस्तुभ भडमुखे याने आपल्या ज्ञानाचा फायदा जनतेला व्हावा या उद्देशाने मराठी भाषेमधून ‘अ‍ॅप’ विकसित केले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरवरून सहजरीत्या मोफत डाउनलोड करता येते. या अ‍ॅप्लिकेशनचे वैशिष्ट म्हणजे राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामधील मतदार आपले नाव सहज शोधू शकतो. यासाठी त्याला मतदान कार्डावरील क्रमांक लिहून स्वत:चे व कुटुंबातील सदस्यांची नावे मिळू शकतात. नावांबरोबर यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदान केंद्राची माहिती मिळते. हे अ‍ॅप्लिकेशन पूर्णपणे मोफत आहे.अ‍ॅप्लिकेशन हाताळण्यासाठी अत्यंत सुटसुटीत असल्यामुळे ते कोणालाही सहजरीत्या सुलभ वापरता येऊ शकते. या अ‍ॅप्लिकेशनवरून मिळालेली यादी भाग क्रमांक व त्यामधील अनुक्रमांक आणि मतदान केंद्र क्रमांकावरून त्या केंद्रावर जाऊन संबंधित कें द्र अधिकाऱ्याला ओळखीचा पुरावा व सदर माहिती दाखवून मतदान करता येणार आहे.