शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

सर्पदंश झालेल्या रुग्णांना आर्थिक मदत करावी : राऊत

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

ओतूर : मंदिरासाठी लाखो रुपयांच्या देणगी देणार्‍या दानशूरांनी सर्पदंश झालेल्या आर्थिक, दुर्बल घटकातील व आदिवासी रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी तातडीचे आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन नारायणगाव (ता. जुन्नर) येथील मिनू मेहता हॉस्पिटलचे सर्पमित्र डॉ. सदानंद राऊत यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथे केले.

ओतूर : मंदिरासाठी लाखो रुपयांच्या देणगी देणार्‍या दानशूरांनी सर्पदंश झालेल्या आर्थिक, दुर्बल घटकातील व आदिवासी रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी तातडीचे आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन नारायणगाव (ता. जुन्नर) येथील मिनू मेहता हॉस्पिटलचे सर्पमित्र डॉ. सदानंद राऊत यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथे केले.
लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नर यांच्या वतीने येथील ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सर्पदंश प्रथमोपचार, सर्पाच्या विविध जाती, त्यांच्या दंश करण्याची पद्धती, सर्पाची स्थाने या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते.
अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे होते.
यानिमित्ताने मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे, मुख्याध्यापक शिवाजी अस्वार, उपमुख्याध्यापक प्रभाकर शिंदे, दिनकर दरोडे, मुख्याध्यापक रामचंद्र तितर, पंकज घोलप, शरद साळवे, लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ चव्हाण, माजी अध्यक्ष जयसिंग परदेशी, लायन्स प्रा. विलास भालेकर, डॉ. भरत घोलप, लायन्सचे खजिनदार यश मस्करे, रवींद्र हांडे, रवींद्र लोहोटे, संजय उर्किडे, विद्यालयाचे शिक्षक व ३०० विद्यार्थी उपस्थित होते.
या निमित्ताने डॉ. घोलप व यश मस्करे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सदानंद राऊत हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्पविष उपचारतज्ज्ञ असून, परदेशात त्यांनी सर्व विष उपचाराबद्दल व्याख्याने दिली आहेत. आतापर्यंत सर्पदंश झालेल्या दोन हजार रुग्णांना उपचार करून जीवनदान दिले आहे.
सर्पदंश झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचार होणे गरजेचे असते, लसी उपलब्ध होत नाही. त्या महाग असतात म्हणून लायन्स क्लब शिवनेरी या लसी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याप्रमाणेच जे धनिक आहेत ते मंदिरासाठी देणग्या देतात. धनिकांनी, दानशूर व्यक्तींनी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचार करणार्‍यांना आर्थिक मदत द्यावी. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचतील, असे आवाहन राऊत यांनी केले.
शरद माळवे यांनी प्रास्ताविक केले. पंकज घोलप यांनी आभार मानले.